शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

कोरोनाबाधितांचा आकडा वाढला तरी चालेल, पण...; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्यमंत्र्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 8:35 PM

PM Narendra Modi holds meeting with Chief Ministers on the current COVID19 situation: कोरोनाचे रुग्ण वाढल्याने एकीकडे राजकारण रंगलेले असताना मोदींनी मुख्यमंत्र्यांना हे आदेश दिले आहेत.

देशात कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या लपविण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण कमी करण्यात येत असल्याचे आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मुख्यमंत्र्य़ांसोबतच्या ऑनलाईन बैठकीत कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी चालेल, परंतू कोरोना चाचणीची संख्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत. (I appeal to you all to stress on COVID19 testing. Our target is to do 70% RT-PCR tests. Let the number of positive cases come high, but do maximum testing. : PM Modi during meeting with CMs)

कोरोनाचे रुग्ण वाढल्याने एकीकडे राजकारण रंगलेले असताना मोदींनी मुख्यमंत्र्यांना हे आदेश दिले आहेत. सर्व राज्यांनी कोरोना टेस्टिंगची व्याप्ती वाढवावी. 70 टक्के RT-PCR टेस्ट झाल्या पाहिजेत. देशातील, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला तरी चालेल, परंतू चाचण्या वाढवायला हव्यात. योग्य पद्धतीने स्वॅब घेणे खूप गरजेचे आहे, तसेच त्याची चाचणी होणेदेखील खूप महत्वाचे आहे, असे मोदी म्हणाले. 

कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी आणि कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णांचा शोध आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे गरजेचे आहे. युद्धपातळीवर हे काम करण्याची गरज आहे. आपल्याला आता पुरेसा अनुभव आलेला आहे. तसेच सोबत अन्य स्त्रोतांसह लसही आहे, असे मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. 

Corona Vaccine Shortage: महाराष्ट्राने 5 लाख डोस वाया घालवले, असे कसे चालेल? प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोपआपल्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबत दोन हात करायचे आहेत. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, पंजाबमध्ये कोरोनाच्या लाटेने पहिली उसळी पार केली आहे. हे एक मोठे संकट आहे. काही राज्यांत प्रशासनाने हे हलक्यात घेतले आहे. लोकांनी सजग रहायला हवे, असे मोदी म्हणाले. (PM Narendra Modi holds meeting with Chief Ministers on the current COVID19 situation)

CoronaVirus: रेमडेसीवीरचे उत्पादन दुप्पट करा; राजेश टोपेंची ७ कंपन्यांसोबत बैठक

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या