CoronaVirus: रेमडेसीवीरचे उत्पादन दुप्पट करा; राजेश टोपेंची ७ कंपन्यांसोबत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 08:17 PM2021-04-08T20:17:22+5:302021-04-08T20:17:41+5:30

CoronaVirus Remdesivir Shortage in Maharashtra: राज्यात कोरोनाचे रुग्ण (Corona Virus) वाढू लागले आहेत. यामुळे ऑक्सिजन, आयसीयू बेडसह रुग्णालयांतील साधे बेड देखील मिळेनासे झाले आहेत. अशातच कोरोनाच्या गंभीर रुग्णांना वाचविण्यासाठी सध्या रेमडेसीवीर हे औषध कामी येत असून त्याचा तुटवडा जाणवू लागला आहे.

CoronaVirus: Double the production of remedesivir; Rajesh Tope's meeting with 7 companies | CoronaVirus: रेमडेसीवीरचे उत्पादन दुप्पट करा; राजेश टोपेंची ७ कंपन्यांसोबत बैठक

CoronaVirus: रेमडेसीवीरचे उत्पादन दुप्पट करा; राजेश टोपेंची ७ कंपन्यांसोबत बैठक

Next

राज्यात कोरोनाचे रुग्ण (Corona Virus) वाढू लागले आहेत. यामुळे ऑक्सिजन, आयसीयू बेडसह रुग्णालयांतील साधे बेड देखील मिळेनासे झाले आहेत. अशातच कोरोनाच्या गंभीर रुग्णांना वाचविण्यासाठी सध्या रेमडेसीवीर हे औषध कामी येत असून त्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. यामुळे एकीकडे कोरोना लसीच्या तुटवड्याशी दोन हात करत असताना राज्य सरकारला आता रेमडेसीवीरचा पुरेसा साठाही करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागत आहेत. (Maharashtra Health Minister Rajesh Tope today chaired a meet with 7 manufacturers of COVID19 drug Remdesivir and asked them to double the production for the State. )

Corona Vaccine Shortage: महाराष्ट्राने 5 लाख डोस वाया घालवले, असे कसे चालेल? प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप


सायंकाळी आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी रेमडेसीवीर बनविणाऱ्या सात कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रासाठी लागणाऱ्या रेमडेसीवीर (Remdesivir) उपलब्धतेसाठी औषधाचे उत्पादन दुप्पट करण्याची सूचना दिली आहे. याबैठकीला एफडीए मंत्री राजेंद्र शिंगाने आणि एफडीएचे अन्य वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. 


राज्यात कोरोना लसीच्या उपलब्धतेवरून केंद्र आणि राज्यात कलगीतुरा रंगला आहे. महाराष्ट्रात आज 23 लाख कोरोना लसी उपलब्ध असल्याचा खुलासा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकताच केला आहे. तसेच पुढच्या तीन दिवसांची लस ही वाटेवर आहे. असे असताना राज्यात कोरोना लसीकरण केंद्रे बंद पडत आहेत. ही परिस्थिती महाराष्ट्र राज्यातच नसून ओडिया, आंध्र प्रदेश सारख्या राज्यांतही उद्भवली आहे. कोरोना उपचारांमध्ये निकषात बसत असणाऱ्या रुग्णांना देण्यात येणारे रेमडेसिवीर हे इंजेक्शन मेडिकलवर मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अचानक तुटवडा निर्माण झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Web Title: CoronaVirus: Double the production of remedesivir; Rajesh Tope's meeting with 7 companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.