शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकमध्ये गणेश विसर्जनादरम्यान तरूणाचा खून कॅमे-यात कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2015 15:53 IST

गणपती विसर्जनादरम्यान तलावात एका तरूणाचा खून झाल्याचे कॅमे-यात कैद झाले आहे.

ऑनलाइन लोकमत
बंगळूर, दि. २६ - गणपती विसर्जनादरम्यान तलावात एका तरूणाचा खून झाल्याचे कॅमे-यात कैद झाले आहे. कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईलमध्ये विसर्जनाचे शूटिंग करणा-या एका तरूणामुळे ही घटना उघडकीस आली आहे. मल्लिकार्जून असे त्या मृत तरूणाचे नाव असून तो तलावात बुडून अपघाताने त्याचा मृत्यू झाल्याचे आधी सर्वांना वाटले होते. मात्र तो बुडून नव्हे तर त्याला जाणूनबुजून बुडवून मारण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. 
एका खासगी कंपनीत काम करणारा मल्लिकार्जुन गणपती विसर्जनाच्या दिवशी मित्रांसोबत बाहेर पडला होता, मात्र त्याच्याऐवजी त्याचा मृतदेहच घरी आला. ज्या तलावात विसर्जन करण्यात येत होते, तेथे एक तरूण मोबाईलमधून शूटिंग करत होता. त्यात मल्लिकार्जुन बुडताना दिसत होता, मात्र बारकाईने पाहिल्यावर तो बुडत नसून तीन ते चार जण त्याला बुडवत होते, असे दिसून आले. व्हिडिओ शूटिंग करणा-याने हे फूटेज मल्लिकार्जुनच्या आईला दाखवले असता आपल्या मुलाचा खून झाल्याचे तिच्या लक्षात आले व  तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. 
याप्रकरणी गुलबर्गा पोलिसांनी अज्ञात तरूणांविरोधात गुन्हा दाखल केला असून सखोल तपास करत आहेत. तसेच मल्लिकार्जुनच्या खूनाचा हेतूचा शोध घेण्यात येत आहे.