राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 13:33 IST2026-04-24T13:32:21+5:302026-04-24T13:33:02+5:30

Jaipur Bomb Threat: जयपूरमध्ये असलेल्या राजस्थान विधानसभेच्या सचिवालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. एकीकडे आयपीएल लढतीमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक केलेली असानाच जयपूरमधील विधानसभा सचिवालयाला संशयास्पद मेसेजच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली होती.

Jaipur Bomb Threat: Threat to blow up Rajasthan Assembly, panic in Jaipur before IPL match | राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 

राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 

जयपूरमध्ये असलेल्या राजस्थान विधानसभेच्या सचिवालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. एकीकडे आयपीएल लढतीमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक केलेली असानाच जयपूरमधील विधानसभा सचिवालयाला संशयास्पद मेसेजच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली होती. ही धमकी प्राप्त झाल्यानंतर याची माहिती त्वरित अधिकाऱ्यांना देण्यात आली. तसेच सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून सचिवालय परिसरात असलेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित बाहेर काढण्यात आले. तसेच संपूर्ण परिसर रिकामी करण्यात आला.

याबाबतची माहिती मिळताच बॉम्ब शोधक पथक आणि बॉम्ब स्कॉड घटनास्थळी दाखल झालं. सुरक्षा यंत्रणांनी विधानसभेच्या संपूर्ण परिसराला घेराव घातला आणि शोधमोहिम सुरू केली. आता येणारे जाणारे लोक आणि संशयास्पद वस्तूंवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे.  याच दरम्यान, जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये आयपीएल सामन्यापूर्वी मॉक ड्रिलचं आयोजन कण्यात आलं होतं. याचदरम्यान बॉम्बची अफवा पसरल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली. तसेच ही मॉक ड्रिल थांबवून यंत्रणांनी बॉम्बचा शोध सुरू केला.

विधानसभेत बॉम्ब असल्याच्या आलेल्या ईमेलमधून दुपारी १ वाजता विधानसभेच्या परिसरात मोठा बॉम्बस्फोट होईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे विधानसभेच्या परिसरातत कमांडो आणि बॉम्बशोधक पथकाच्या कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते. तसेच विधानसभा प्रशासनाने सुरक्षा प्रोटोकॉल लागू केला होता.  

Web Title : राजस्थान विधानसभा को बम से उड़ाने की धमकी, IPL से पहले दहशत

Web Summary : राजस्थान विधानसभा को बम से उड़ाने की धमकी मिली, जिसके बाद तुरंत खाली कराया गया और तलाशी अभियान चलाया गया। एक ईमेल में विस्फोट की चेतावनी के बाद बम निरोधक दस्ते और कमांडो तैनात किए गए। सुरक्षा प्रोटोकॉल लागू; स्टेडियम के पास खोज जारी।

Web Title : Bomb Threat at Rajasthan Assembly Before IPL Match Creates Panic

Web Summary : Rajasthan Assembly received a bomb threat before an IPL match, prompting immediate evacuation and security sweeps. Bomb squads and commandos were deployed after an email warned of an explosion. Security protocols enacted; search operation underway near the stadium.