शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील कंटेंट रोखण्यासाठी केंद्र सरकार काही करत आहे का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 15:38 IST

Supreme court Central Govt: रणवीर अलाहाबादिया प्रकरणावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अश्लील आशय असणारे कार्यक्रम रोखण्याबद्दल केंद्राला सवाल केला आहे. 

Supreme Court News: युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने युट्यूब आणि इतर सोशल मीडियावरील अश्लील कंटेंटवरून केंद्र सरकारला सवाल केला. रणवीर अलाहाबादियानेसर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे विचारणा केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंठपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. रणवीर अलाहाबादियाला दिलासा देण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चांगली कानउघाडणी केली. 

याच प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे विचारणा केली की, युट्यूब आणि इतर सोशल मीडियावर अश्लील कंटेट संदर्भात सरकार काही करत आहे का?

रणवीर अलाहाबादियाला दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाच्या भाषेचा मुद्दा उपस्थित करत फटकारले. त्यानंतर त्याला अटकेपासून संरक्षण दिले.

अलाहाबादियाच्या वक्तव्याबद्दल बोलताना न्यायालय म्हणाले, "असे दिसतेय की, त्याच्या डोक्यात काही घाण भरलेली आहे आणि त्यामुळेच त्याने शोमध्ये अशा प्रकारचे विधान केले. अशा प्रकारच्या वर्तणुकीची निंदा केली गेली पाहिजे. हे सहन करता कामा नये. फक्त यासाठी की स्वतःला असे समजतो की तो खूप प्रसिद्ध आहे आणि कोणतेही शब्द बोलू शकतो. मग तो संपूर्ण समाजाला हलक्यात घेत आहे का? पृथ्वीवर कुणी आहे का, ज्याला ही भाषा आवडेल?", असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला. 

"अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर कोणालाही सामाजिक मूल्यांच्या विरोधात काहीही बोलण्याची मोकळीक नाहीये. समाजाचे स्वतःचे काही मूल्ये आहेत. समाजाचे आपली कक्षा आहे आणि तुम्ही त्याचा आदर केला पाहिजे", अशा शब्दात न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला खडसावले. 

टॅग्स :Ranveer Allahbadiaरणवीर अलाहाबादियाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारSocial Mediaसोशल मीडिया