Air India Ahmedabad Plane Crash : विमान दुर्घटनेनंतर रोहित-सूर्यासह हे स्टार क्रिकेटर्सही हळहळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:53 IST2025-06-12T17:39:03+5:302025-06-12T17:53:42+5:30

रोहित शर्मा अन् सूर्यकुमार यादवसह अन्य स्टार क्रिकेटर्संनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Indian Cricketers including Harbhajan Singh and Yusuf Pathan Express Shock On Air India Ahmedabad Plane Crash | Air India Ahmedabad Plane Crash : विमान दुर्घटनेनंतर रोहित-सूर्यासह हे स्टार क्रिकेटर्सही हळहळले

Air India Ahmedabad Plane Crash : विमान दुर्घटनेनंतर रोहित-सूर्यासह हे स्टार क्रिकेटर्सही हळहळले

Air India Ahmedabad Plane Crash  :  गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरुवारी लंडनच्या दिशेनं झेपावलेले एअर इंडियाचे AI171 विमान क्रॅश झाले अन्  भीषण अपघात घडला. या विमानातून २४२ प्रवासी आणि १० क्रू मेंबर्स प्रवास करत होते.  या विमान अपघातानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय क्रिकेटर्संनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंगसह युसूफ पठाण याने एक्स अकाउंटवरुन ट्विट करत या घटनेमुळे मोठा धक्का बसल्याचे म्हटले आहे. 

हरभजन सिंग युसूफ पठाण यांच्याशिवाय रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे,  सूर्यकुमार यादव यासह अन्य स्टार क्रिकेटर्संनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुर्देवी विमान अपघातातील घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.


हरभजन सिंग याने ट्विटमध्ये लिहिलंय की, "अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताची बातमी ऐकून मोठा धक्का बसला. ही खूपच दु:खद घटना आहे. अशा क्षणी शब्दही अपूरे वाटतात. या प्रसंगी माझ्या संवेदना सर्व पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.

लोकसभा खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याने एक्स अकाउंटवरुन पोस्ट करताना लिहिलंय की,  अहमदाबाद-लंडन विमान अपघाताबद्दल ऐकून खूप मोठा धक्का बसला. सर्व प्रवाशांच्या आणि क्रूच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो, असा उल्लेख युसूफ पठाण याने आपल्या ट्विटमध्ये केला आहे. 

युवराज सिंग ट्विट

रोहित शर्मा सोशल मीडिया पोस्ट

अजिंक्य रहाणे

सूर्यकुमार यादव

शिखर धवन

Web Title: Indian Cricketers including Harbhajan Singh and Yusuf Pathan Express Shock On Air India Ahmedabad Plane Crash