शहरं
Join us  
Trending Stories
1
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
2
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
3
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
4
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
5
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
6
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
7
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
8
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
9
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
10
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
11
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
12
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
13
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
14
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
15
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
16
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
17
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
18
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
19
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
20
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 19:03 IST

India-Afghanistan Relation : बदलत्या जिओपॉलिटिकल समीकरणांत हा दौरा महत्वाचा.

India-Afghanistan Relation : अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या पुनरागमनानंतर काही काळ गोठलेले भारत-अफगाणिस्तान संबंध आता हळूहळू नव्या दिशेने पुढे जात आहेत. औपचारिक राजनैतिक मान्यता नसली तरी, दोन्ही देश आर्थिक आणि व्यापारिक सहकार्य वाढवण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री नूरुद्दीन अजीजी पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.  द्विपक्षीय व्यापार वाढ, भारतीय गुंतवणूक व औद्योगिक सहकार्य, चाबहार बंदराचा अधिक प्रभावी वापर आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीचे पर्याय यावर चर्चा होऊ शकते. 

दौऱ्यातून बदलत्या जियोपॉलिटिक्सचा संकेत

तज्ज्ञांचे मत आहे की, अजीजी यांचा हा दौरा फक्त शिष्टाचार भेट नाही, तर बदलत्या प्रादेशिक शक्तिसंतुलनाचा एक भाग आहे. या दौऱ्यामुळे अफगाणिस्तानला तातडीच्या आर्थिक मदतीचे मार्ग खुले होतील आणि भारताला मध्य आशियातील आपली रणनीतिक उपस्थिती मजबूत करण्याची संधी मिळेल. विशेष म्हणजे, भारताने अद्याप तालिबान सरकारला औपचारिक मान्यता दिलेली नाही. तरीही व्यापार, मानवीय मदत आणि प्रोजेक्ट कनेक्टिव्हिटी यांमध्ये दोन्ही देश व्यावहारिक सहकार्याला प्राधान्य देत आहेत.

भारत-अफगाणिस्तान संबंधांची नवी दिशा

पाकिस्तानसोबतचे संबंध खराब झाल्यानंतर तालिबान सरकार भारताशी संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात आहे. भारतही अफगाणिस्तानातील आपले मोठे प्रोजेक्ट्स, गुंतवणूक आणि रणनीतिक पायाभूत सुविधा सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवहारिक डिप्लोमसी वापरत आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आले होते. त्या दौऱ्यानंतर भारताने अफगाणिस्तानमधील आपले दूतावास पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता अफगाणी वाणिज्य मंत्री भारत दौऱ्यावर आले आहेत.

भारताचे परराष्ट्र धोरण

तालिबानला राजकीय मान्यता नाही, पण भारताने थेट संवाद आणि आर्थिक सहकार्य सुरू ठेवले आहे. याचे कारण म्हणजे, हा मार्ग पाकिस्तान आणि चीनच्या प्रभावाला आव्हान देण्यास मदत करतो. तसेच, अफगाणिस्तानने अलिकडे घेतलेले निर्णय भारताला लाभदायक आहेत. यामध्ये एरियाना एअरलाईनने काबूल-दिल्ली कार्गो रुटचे भाडे कमी केले असून, यामुळे अफगाण व्यापाऱ्यांना भारतीय बाजारपेठेत माल पाठवणे अधिक सोपे झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Afghan Trade Minister Visits India for Crucial Talks

Web Summary : Afghanistan's Trade Minister is in India to boost trade and investment. Discussions include the Chabahar port and regional connectivity. This visit signals shifting geopolitics, offering economic aid to Afghanistan and strengthening India's Central Asia presence despite lacking formal recognition of the Taliban government.
टॅग्स :IndiaभारतAfghanistanअफगाणिस्तानbusinessव्यवसाय