शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

अपयश झाकण्यासाठी सरकार ‘ट्रिपल तलाक’मध्ये पडतेय

By admin | Updated: October 14, 2016 02:03 IST

आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि देशातील प्रमुख मुस्लिम संघटनांनी गुरुवारी समान नागरी कायद्यावरील विधि आयोगाच्या प्रश्नावलींना विरोध

नवी दिल्ली : आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि देशातील प्रमुख मुस्लिम संघटनांनी गुरुवारी समान नागरी कायद्यावरील विधि आयोगाच्या प्रश्नावलींना विरोध केला आहे, तर आमच्या समुदायाविरुद्ध सरकार युद्ध करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. येथे पत्रकार परिषदेत बोलताना मुस्लिम संघटनांनी दावा केला की, जर समान नागरी कायदा लागू केला, तर सर्व नागरिकांना एकाच रंगात रंगविल्यासारखे होईल. देशातील अनेकत्त्ववाद आणि विविधता यांच्यासाठी हा धोका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पर्सनल लॉ बोर्डाचे महासचिव वली रहमानी, जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी, आॅल इंडिया मिल्ली काऊन्सिलचे प्रमुख मंजूर आलम, जमात- ए- इस्लामी हिंदचे पदाधिकारी मोहम्मद जफर, आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य कमाल फारुकी आणि अन्य काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तीन तलाक आणि समान नागरी कायद्याच्या मुद्यावर सरकारला घेरले. तीन तलाकच्या मुद्यावर सरकारची भूमिका खोडून काढताना या संघटनांनी दावा केला की, आमच्या समुदायात अन्य समुदायांच्या विशेषत: हिंदू समुदायाच्या तुलनेत घटस्फोटाचे प्रकार कमी आहेत. बोर्ड आणि मुस्लिम संघटना या मुद्यावर मुस्लिम समुदायाला जागरूक करण्यासाठी देशभरात मोहीम राबविणार असून, याची सुरुवात लखनौमधून करणार असल्याचे रहमानी यांनी सांगितले.ते म्हणाले की, आपल्या अपयशापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. नव्हे, या समुदायासोबत सरकार युद्ध करू इच्छित आहे. बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पर्सनल लॉमध्ये काही त्रुटी असल्यास त्या दूर केल्या जातील. जमियतचे प्रमुख अरशद मदनी म्हणाले की, देशासमोर अनेक आव्हाने आहेत. सीमेवर तणाव आहे. निर्दोष नागरिकांच्या हत्या होत आहेत. सरकारने या आव्हानांकडे लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, मुस्लिम समुदायातीलच काही नागरिकांनी तीन तलाकच्या मुद्यावर पर्सनल लॉ बोर्डाच्या भूमिकेला विरोध केला आहे, असा प्रश्न केला असता रहमानी म्हणाले की, येथे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)