शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 15:38 IST

Accident In Jaipur: राजस्थानमधील जयपूर येथे एक भीषण अपघात झाला आहे. येथे एका सुसाट  डंपरने एका कारला धडक दिल्यानंतर आणखी ४ वाहनांना उडवले. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे ४० जण जखणी झाले आहेत.

राजस्थानमधील जयपूर येथे एक भीषण अपघात झाला आहे. येथे एका सुसाट  डंपरने एका कारला धडक दिल्यानंतर आणखी ४ वाहनांना उडवले. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे ४० जण जखणी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आणखी काही जण कारखाली दबलेले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात हरमाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहामंडी रोडवर झाला.  प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावर काळ बनून आलेला हा डंपर समोर दिसेल त्याला चिरडत पुडे गेला. त्यामुळे या डंपरखाली सुमारे ५० जण चिरडले गेले. सदर डंपरच्या चालकाने मद्यपान केलेले होते. पहिल्या कारला धडक दिल्यानंतर हा डंपर तिथेच थांबला नाही तर त्याने आणखी चार गाड्यांना धडक दिली.  आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, सदर डंपरचालक एक ते पाच किमी अंतरामध्ये समोर जो कुणी आला त्याला चिरडत पुढे गेला.

या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका डंपर चालकाने ५ कारनां धडक देत सुमारे ५० जणांना चिरडले. त्यात १० जणांचा मृत्यू झाला. तर ४० जण जखमी झाले. जखमींना रुग्णायलात दाखल करण्यात आले आहे. सदर डंपरचालक मद्यधुंद अवस्थेत होता. दरम्यान, या डंपरने चिरडलेल्या कारखाली आणखी काही जण दबलेले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Jaipur: Speeding Dumper Kills 10, Crushes 50, Hits Multiple Vehicles

Web Summary : A horrific accident in Jaipur claimed 10 lives and injured 40 as a speeding dumper truck collided with a car and multiple other vehicles. The driver was allegedly intoxicated, crushing approximately 50 people. Rescue efforts are underway to free those trapped under the wreckage.
टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थानDeathमृत्यू