शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
6
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
9
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
10
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
13
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
16
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
17
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
18
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
19
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
20
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: फायटर जेट इजेक्शन सीटची हाय-स्पीड चाचणी यशस्वी; 'तेजस'सह सर्व स्वदेशी विमानांची सुरक्षा वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 14:12 IST

डीआरडीओची लढाऊ विमानाच्या आपत्कालीन बचाव प्रणालीची हाय-स्पीड रॉकेट स्लेड चाचणी यशस्वी झाली.

DRDO Fighter Jet Pilot Ejection Test: भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने संरक्षण क्षेत्रात नवा विक्रम स्थापित केला आहे. लढाऊ विमानांसाठी विकसित केलेल्या स्वदेशी इमर्जन्सी एस्केप सिस्टिम हाय-स्पीड रॉकेट स्लेड चाचणी यशस्वी झाली आहे. चंदीगढ येथील टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरीमधील रेल ट्रॅक रॉकेट स्लेड फॅसिलिटीवर हा महत्त्वपूर्ण प्रयोग पार पडला. या अभूतपूर्व यशामुळे, भारत आता स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा अत्यंत गुंतागुंतीच्या बचाव यंत्रणेची चाचणी करण्याची क्षमता असलेल्या जगातील मोजक्या देशांच्या यादीत समाविष्ट झाला आहे.

८०० किमी/तास वेगावर अचूक यश

लढाऊ विमान ताशी ८०० किलोमीटर वेगाने हवेत उडत असताना निर्माण होणाऱ्या परिस्थिती निर्माण करत ही चाचणी घेण्यात आली. तेजस लढाऊ विमानाचा पुढील भाग दोन रॉकेट स्लेडवर ठेवून  रॉकेट मोटर्सच्या साह्याने अचूक वेग प्राप्त करण्यात आला. या चाचणी दरम्यान कॉकपिटचे कॅनोपी (काच) सुरक्षितपणे तुटले, सीट यशस्वीरित्या बाहेर फेकली गेली आणि डमी पायलट पॅराशूटच्या मदतीने पूर्णपणे सुरक्षितपणे खाली उतरला. काच तुटणे, सीट बाहेर पडणे आणि पायलटची सुरक्षित रिकव्हरी या सर्व टप्प्यांमध्ये डीआरडीओला १०० टक्के यश मिळाले. ही चाचणी अधिक गुंतागुंतीची  मानली जात होती.

सध्या भारताच्या बहुतेक लढाऊ विमानांमध्ये मार्टिन-बेकरसारख्या परदेशी कंपन्यांनी बनवलेल्या इजेक्शन सीट्स वापरल्या जातात. डीआरडीओच्या या यशामुळे, देशाला पायलट इजेक्शन सीटसाठी विदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहावे लागणार नाही. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी या उपलब्धीबद्दल संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, हे तंत्रज्ञान तेजस आणि आगामी एएमसीए सारख्या स्वदेशी लढाऊ विमानांच्या सुरक्षिततेसाठी आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

भारत आता अमेरिका, रशियाच्या पंक्तीत

यापूर्वी जगातील अमेरिका, रशिया आणि फ्रान्ससारखे काही मोजकेच देश इतक्या वेगवान इजेक्शन चाचण्या करू शकत होते. या चाचणीमुळे आता भारतही त्या निवडक देशांच्या गटात सामील झाला आहे. अशा चाचणीतूनच प्रत्यक्ष उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड किंवा क्रॅश झाल्यास पायलटचा जीव वाचू शकणार आहे.

संरक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या ऐतिहासिक यशामुळे डीआरडीओ, भारतीय वायुसेना, वैमानिकी विकास एजन्सी आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे अभिनंदन केले. त्यांनी याला 'आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेसाठी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : DRDO's High-Speed Ejection Seat Test Successful, Boosts Indigenous Aircraft Safety

Web Summary : DRDO successfully tested a high-speed ejection seat system for fighter jets. This achievement enhances the safety of Tejas and other indigenous aircraft. India joins a select group with this capability, moving towards self-reliance in defense technology and reducing dependence on foreign systems.
टॅग्स :DRDOडीआरडीओIndiaभारत