शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

'मोदीजी जरा इकडे बघा; विकसनशील देशांच्या यादीतून ट्रम्प यांनी काढलं भारताला बाहेर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 18:17 IST

अमेरिकेमधील भारतीय उत्पादनांच्या निर्यातीला विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

मुंबई - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या २४ फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र या दौऱ्याआधी यूएस प्रशासनाने भारताला मोठा झटका दिला आहे. त्यामुळे भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिका-भारत यांच्यातील व्यापाराच्या दृष्टीकोनातून ही बाब महत्वपूर्ण मानली जात आहे. 

अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींनी विकसनशील देशांच्या यादीतून भारताला बाहेर काढलं आहे. त्यामुळे भारताच्या निर्यात करावर अमेरिका सूट देणार नाही. या यादीत असणाऱ्यांना देशांना निर्यात करात सूट दिली जाते, या देशामुळे अमेरिकेच्या उद्योगांवर कोणता परिणाम होत नाही असं मानलं जातं. या यादीत ब्राझील, इंडोनेशिया, हॉंगकॉंग, दक्षिण अफ्रिका अशा देशांचा समावेश आहे. 

अमेरिकेचा तर्क काय?भारत आता जी २० देशांच्या यादीत आला आहे. जगभरातील व्यापारामध्ये त्याचा हिस्सा ०.५ टक्केपेक्षा जास्त झाला. हा निर्णय तेव्हा घेण्यात आला ज्यावेळी भारत अमेरिकेसोबत व्यापार संबंध आणि त्यातून फायदा मिळवण्याच्या प्रयत्नात होता. मात्र या यादीतून वगळल्याने भारतासाठी अडचणीचं ठरणार आहे. यूएसटीआरचं म्हणणं आहे की, ज्या देशाचा व्यापार जगात ०.५ टक्क्यापेक्षा जास्त होतो, त्याला आम्ही कायद्यानुसार विकसित देशांच्या यादीत समाविष्ट करतो. 

काय परिणाम होणार?यामुळे अमेरिकेमधील भारतीय उत्पादनांच्या निर्यातीला विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एखाद्या अमेरिकन उद्योग लॉबीने असा आरोप केला की एखाद्या उत्पादनात भारत सरकारच्या अनुदानामुळे अमेरिकन हितसंबंध धोक्यात येत आहेत तर त्याचा तपास सुरू होईल आणि त्या वस्तूवर अमेरिकेतील भारतीय निर्यात ठप्प होईल. त्या उत्पादनाच्या निर्यातीवर बंदी येऊ शकते. विशेष करुन कृषी उत्पादनासाठी हे नुकसानकारक आहे. 

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार आहे. तेव्हा अहमदाबादला भेट देतील. त्यावेळी तिथल्या झोपड्या लपवण्यासाठी एक ६०० मीटरची भिंत बांधण्यात येत आहे पण, अशी फाटक्या झोळीला ठिगळे लावण्यापेक्षा मोदीजी जरा इकडे बघा, गरिबी झाकण्याची आता गरज नाही, कारण, ट्रम्प यांनी भारताला विकसनशील देशांच्या यादीतून वगळले असून अक्षरशः गरिबीत काढले आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला आहे. 

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतAmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेस