शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

यंदा जिल्ह्यात ४६०६ मिमी कमी पाऊस

By admin | Updated: September 26, 2015 19:27 IST

धरणांमध्ये साठा कमी : खरीप पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

धरणांमध्ये साठा कमी : खरीप पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता
ठाणे : ठाणे हा अतिपावसाचा जिल्हा म्हणून संबोधला जात असताना मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत जिल्ह्यात ४,६०६ मिमी पाऊस कमी पडला आहे. यामुळे पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमधील पाणी साठा कमी झाला आहे. खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी आजच्या दिनांकापर्यंत १६८६८.५४ मिमी पाऊस पडला होता. सरासरी २४०९.७९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली होती. त्या तुलनेत या वर्षी आजपर्यंत १२ हजार २६२.७५ मिमी पाऊस पडला असून या पावसाची सरासरी एक हजार ७५१.८२ मिमी नोंद झाली आहे. यावरून जिल्ह्यात ४,६०६ मिमी म्हणजे सरासरी ६५८.१५ मिमी कमी पाऊस पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी सर्वाधिक पाऊस ठाणे तालुक्यात १९२५.६० मिमी पडला आहे. सरासरी ७८ टक्के पाऊस झाला असून मागील वर्षी २५४८.८० मिमी पाऊस पडला होता. याप्रमाणेच भिवंडी तालुक्यात १८८४ मिमी तर या खालोखाल कल्याण १८१७.५० मिमी, उल्हासनगर १७४१.७४, शहापूर १७१८.२०, अंबरनाथ १६५५.२१ आणि मुरबाडला सर्वात कमी १५२०.५० मिमी पाऊस पडला असून येथे कमी पावसाची नोंद असली तरी या कालावधीत वादळ-वार्‍यापासून सर्वाधिक नुकसान मुरबाडमध्येच झाल्याचे निदर्शनात आले आहे. (प्रतिनिधी)