शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

CoronaVirus Live Updates : सुखावणारी आकडेवारी! कोरोना संकटात मोठा दिलासा; 24 तासांत 14,313 नवे रुग्ण, 224 दिवसांतील नीचांक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 10:32 AM

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 224 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. 

नवी दिल्ली -  वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगात कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 23 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी भारतामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा आकडा केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 224 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. 

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 14,313 नवे रुग्ण आढळून आले आहेत.  भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (12 ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 14 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3,39,85,920 वर पोहोचली. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 2,14,900 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे 4,50,963 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

रिकव्हरी रेट 98.04 टक्क्यांवर

देशात 3,33,20,057 जणांनी कोरोनावर मात केली आहे. लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर रिकव्हरी रेट 98.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 95,89,78,049 लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. कोरोनावर जगभरात संशोधन सुरू आहे. संशोधनातून आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रक्त पातळ करण्याच्या औषधामुळे कोरोना मृत्यूचा धोका 50 टक्क्यांनी कमी होत असल्याचं आता समोर आलं आहे. अशा रुग्णांमध्ये कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता देखील सामान्य रुग्णांपेक्षा 43 टक्के कमी आहे. लॅन्सेट ई क्लिनिकल मेडिसिन या संशोधन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चमध्ये हे समोर आले आहे.

18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 6,195 रुग्णांवर संशोधन

अमेरिकेतील मिनीसोटा विद्यापीठ आणि स्वित्झर्लंडमधील बेसेल विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला, अमेरिकेतील 12 रुग्णालये आणि 60 क्लिनिकमध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 6,195 रुग्णांवर हे संशोधन करण्यात आले. सर्व रुग्ण 4 मार्च ते 27 ऑगस्ट 2020 दरम्यान कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. संशोधकांनी रक्ताच्या गुठळ्या नसलेले पण उपचार घेत असलेले रुग्ण आणि कोरोना मृत्यूची शक्यता यांच्यातील नेमक्या संबंधांचा अभ्यास केला. यामध्ये जे रुग्ण कोरोना ग्रस्त होण्यापूर्वी रक्त पातळ करणारी औषधे घेत होते त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता 43 टक्के कमी होती असं आढळून आलं आहे. संशोधकांनी कोरोना आधी किंवा त्यापूर्वी रक्त पातळ करणारी औषधे घेतलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी दिसून आल्याचं म्हटलं.

आणखी वाचा 

रक्त पातळ करण्याच्या औषधामुळे कोरोना मृत्यूचा धोका 50 टक्क्यांनी कमी; रिसर्चमधून मोठा खुलासा

अरे व्वा! "कोरोना लस घ्या आणि भेटवस्तू, तेल मोफत मिळवा"; भन्नाट ऑफरमुळे 'या' ठिकाणी मोठ्या रांगा 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लस