Corona Vaccine : अरे व्वा! "कोरोना लस घ्या आणि भेटवस्तू, तेल मोफत मिळवा"; भन्नाट ऑफरमुळे 'या' ठिकाणी मोठ्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 01:09 PM2021-10-11T13:09:22+5:302021-10-11T13:19:54+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहे.

कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहे. लोकांनी स्वतः पुढे येत कोरोना लस (Corona Vaccine) घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. वेगाने लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत देशातील कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. मात्र अद्यापही अनेकांच्या मनात लसीबाबत संभ्रम आणि भीती असल्याने ते लस घेण्यास नकार देत आहेत.

कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहे. लोकांनी स्वतः पुढे येत कोरोना लस (Corona Vaccine) घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

देशातील कोट्यवधी लोकांनी कोरोना लस घेतली आहे. अनेक कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांना विविध भेटवस्तू दिल्या जात आहेत. याच दरम्यान देशातील एका लसीकरण नागरिकांना केंद्रावर जबरदस्त ऑफर देण्यात आली आहे. यामुळे लस घेण्यासाठी आता लोकांची गर्दी होत आहे.

गुजरातमध्ये कोरोना लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक लीटर खाद्यतेल आणि इतर अनेक भेटवस्तू लकी ड्रॉ स्वरूपात ठेवण्यात आल्या आहेत. ANI ने दिलेल्या माहितीनुसार नगरपालिकेने ही खास योजना लोकांसाठी सुरू केली आहे.

नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी रजनीकांत हेमराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, झोपडपट्टी आणि गरीब लोकसंख्येच्या परिसरातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना आखण्यात आली होती. त्यांच्यामध्ये या मार्फत जनजागृती केली जात आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 100 टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. या योजनेला अधिक आकर्षक बनवण्यासाठी आता साप्ताहिक "लकी ड्रॉ" ठेवण्यात आला असून नागरिकांचा प्रतिसाद त्यामुळे वाढत आहे असं देखील अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

गुजरातप्रमाणे याआधी देखील अनेक राज्यात जास्तीत जास्त लोकांनी कोरोना लस घेण्यासाठी पुढाकार घ्यावा म्हणून अशा भन्नाट ऑफर्स देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत असला तरी लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे.

मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे. मात्र याच दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं म्हटलं जोत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.