शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

"मोदी सरकार आयकर विभाग, ED आणि CBI ला आपल्या बोटांवर नाचवतं", राहुल गांधींचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 5:29 PM

Rahul Gandhi And Modi Government : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - दिग्दर्शक अनुराग कश्यप, विकास बेहेल आणि अभिनेत्री तापसी पन्नूच्या घरावर आणि मालमत्तांवर प्राप्तिकर विभागानं छापे टाकले आहेत. ही कारवाई फँटम फिल्म्सशी संबंधित असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुंबई आणि पुण्यातल्या अनेक ठिकाणी प्राप्तिकर विभागाची पथकं छापे टाकत आहेत. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. म्हणींचा वापर करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 

राहुल गांधी यांनी आयकर विभाग (Income Tax Department), सक्तवसुली संचालनालय (ED) आणि केंद्रीय तपास यंत्रणा (CBI) याबाबत ‘उंगलियों पर नचाना’ या म्हणीचा वापर करत केंद्र सरकार यांना आपल्या बोटांवर नाचवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी माध्यमांबाबतही एक म्हण लिहिली आहे. माध्यमं ही पंतप्रधान मोदी यांचे मित्र असल्याचं म्हटलं आहे. तसेच 'खिसियानी बिल्ली खंबा नोचे' या म्हणीचा वापर करुन सरकार शेतकरी नेते आणि त्यांच्या समर्थकांवर छापे टाकत असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

"जनतेसाठी मोदी सरकारचे पर्याय - व्यवसाय बंद करा, चूल फूका, खोटी आश्वासनं खा"; राहुल गांधींचं टीकास्त्र

राहुल गांधी यांनी सिलिंडरच्या वाढत्या दरावरून निशाणा साधला आहे. "एलपीजी सिलिंडरचे दर पुन्हा एकदा वाढले, जनतेसाठी मोदी सरकारचे पर्याय – व्यवसाय बंद करा, चूल फूका, खोटी आश्वासनं खा" असं ट्विट करत राहुल गांधी केलं असून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात 100 रूपयांची वाढ झाली होतीय यापूर्वी 25 फेब्रुवारी रोजी गॅसचे दर 25 रूपयांनी वाढले होते. त्यापूर्वी 4 फेब्रुवारी रोजी 25 रूपये, त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी 50 रूपयांची वाढ करण्यात आली होती. 

"मोदींना घाबरत नाही म्हणून मला 30 सेकंदात झोप लागते मात्र..."; राहुल गांधींची बोचरी टीका

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या (Tamilnadu Election 2021) तारखेची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या राहुल गांधी तामिळनाडूमध्ये असून त्यांनी तेथील मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. "मला रात्री फक्त 30 सेकंदांमध्ये झोप लागते. कारण मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही. मोदींना वाटतं की ते तामिळनाडूच्या लोकांना कंट्रोल करू शकतात. मात्र आता हेच नागरिक या रिमोटमधील बॅटरी काढून ती फेकून देणार आहेत" असं म्हणत राहुल यांनी हल्लाबोल केला आहे. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतBJPभाजपाcongressकाँग्रेसCBIगुन्हा अन्वेषण विभागIncome Taxइन्कम टॅक्स