शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

Citizenship Amendment Bill: कोट्यवधी वंचित आणि पीडितांचं स्वप्न अखेर आज साकार- अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 21:41 IST

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे.

नवी दिल्ली- लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या विरोधानंतर राज्यसभेत विधेयकाच्या बाजूने 125 मते पडली, तर विधेयकाच्या विरोधात 105 मत पडल्यानं हे विधेयक मंजूर झालं आहे. आता विधेयकाचं कायद्यात रुपांतर होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे या विधेयकांसाठी अमित शाहांनी घेतलेलं प्रयत्न हे वाखाणण्याजोगे आहेत. विरोधकांनी विरोध केलेला असतानाही अमित शाहांनी त्यांचे दावे खोडून काढत या विधेयकांच्या समर्थनाची बाजू लावून धरली होती. विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर अमित शाहांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कोट्यवधी वंचित आणि पीडित लोकांचं स्वप्ने आज प्रत्यक्षात उतरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पीडित आणि वंचित लोकांच्या सन्मान आणि सुरक्षिततेचा संकल्प केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार, असंही अमित शाह म्हणाले आहेत. मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी विधेयकावर आज राज्यसभेत मतदान झालं. या मतदानावेळी शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग केला. मात्र याचा अप्रत्यक्ष फायदा सत्ताधारी भाजपाला झाला. शिवसेनेच्या खासदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यानं बहुमताचा आकडा खाली आला. राज्यसभेत विधेयकाच्या बाजूनं 125, तर विरोधात 105 खासदारांनी मतदान केलं. याआधी शिवसेनेनं लोकसभेत विधेयकाला पाठिंबा दिला होता. नागरिकत्व सुधारणा विधेयकावर परवा लोकसभेत मतदान झालं असता त्यावेळी 311 खासदारांनी विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं होतं. तर 80 सदस्यांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं होतं. विशेष म्हणजे राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलेल्या शिवसेनेनं विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु आता शिवसेनेनं सभात्याग केल्यानं विधेयकाच्या मंजुरीचा मार्ग सुकर झाला. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक