शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात शांतादुर्गेच्या छत्र्या घेऊन नाचतात ‘ख्रिस्ती’

By admin | Updated: March 7, 2015 01:15 IST

घर वापसी, मदर तेरेसांबाबत अनुद्गार अशा घटनांमुळे देश धार्मिक विद्वेषाने ढवळलेला असताना पणजीपासून ४0 किलोमीटरवर कुंकळ्ळीत मात्र या गढूळ वातावरणाची झळही पोहोचलेली नाही.

सुशांत कुंकळयेकर - मडगावघर वापसी, मदर तेरेसांबाबत अनुद्गार अशा घटनांमुळे देश धार्मिक विद्वेषाने ढवळलेला असताना पणजीपासून ४0 किलोमीटरवर कुंकळ्ळीत मात्र या गढूळ वातावरणाची झळही पोहोचलेली नाही. येथे हिंदू व ख्रिस्ती लोकांनी एकत्र येऊन शिगमा साजरा केला. आणखी तीन दिवसांनी म्हणजे बुधवारी होणाऱ्या देवी शांतादुर्गेच्या छत्रोत्सवाची उत्सुकता या गावातील हिंदूंएवढीच ख्रिश्चन लोकांनाही लागून राहिलेली आहे. कुंकळ्ळीची देवी शांतादुर्गा म्हणजे सायबिणीचीच (मदर मेरीची) बहीण, अशी भावना ख्रिस्ती लोकांमध्ये आहे. कुंकळ्ळीची साऊद सायबीण (अवर लेडी आॅफ हेल्थ) ही फातर्पेच्या शांतादुर्गेची खास बहीण अशी भावना हिंदूंमध्ये आहे. छत्रोत्सवाची खासीयत म्हणजे हिंदूंप्रमाणेच ख्रिस्ती लोकही यात सहभागी होतात. देवीच्या छत्र्या घेऊन हे ख्रिस्ती लोक आनंदाने बेधुंद होऊन नाचतात. (प्रतिनिधी)‘ते’ आपले मूळ विसरले नाहीतया उत्सवामागील भावना अशी की, १६व्या शतकात पोर्तुगिजांनी जो हिंदू देवळांचा विध्वंस केला त्याची सर्वात अधिक झळ सासष्टी तालुक्याला बसली. शांतादुर्गेचे देऊळ १५८३ साली पोर्तुगिजांनी तोडून त्या जागी अवर लेडी आॅफ हेल्थ (साऊद सायबीण)चे चर्च उभारले. या वेळी स्थानिकांनी देवी शांतादुर्गा या जागेतून जवळच असलेल्या फातर्पे गावात हलवली. त्या वेळी फातर्पे हा गाव सौंदेकरांच्या राजवटीखाली होता. यामुळे पोर्तुगिजांची सत्ता तेथे चालत नसे. या वेळी कित्येक हिंदूंना पोर्तुगिजांनी धर्मांतरित केले. मात्र, हे धर्मांतरित अजूनही आपली मुळे विसरलेले नाहीत. कुंकळ्ळीतील छत्रोत्सव त्याचेच उदाहरण आहे.