जमिनीवर 'कोरियन स्टाईल'ची विचित्र चिन्ह... ३ बहिणींच्या खोलीत काय सापडलं? धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 12:52 IST2026-02-07T12:52:01+5:302026-02-07T12:52:46+5:30
कुटुंबातील एका नातेवाईकाने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.

फोटो - ndtv.in
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे तीन सख्या बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. कोरियन गेमच्या व्यसनामुळे या तिघींनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात दिसत आहे. जेव्हा त्यांच्या बंद खोलीचा दरवाजा उघडण्यात आला, तेव्हा जमिनीवर 'कोरियन स्टाईल'ची काही विचित्र चिन्हं रेखाटलेली होती आणि घरातील वातावरण अतिशय भीतीदायक होतं. कुटुंबातील एका नातेवाईकाने एनडीटीव्हीशी बोलताना अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.
मुलींचा नातेवाईक तनू याने याप्रकरणी धक्कादायक माहिती दिली. तनूने सांगितलं की, घटनेच्या वेळी घर आतून बंद होतं. जेव्हा पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा तिथले दृश्य अत्यंत भयानक होतं. जमिनीवर 'कोरियन स्टाईल'ची काही विचित्र चिन्हं काढलेली होती, ज्यावरून असा संशय व्यक्त केला जात आहे की, त्या मुली 'कोरियन लव्ह' किंवा एखाद्या ऑनलाइन गेमच्या प्रभावाखाली होत्या. मात्र पोलिसांनी अशी कोणतीही चिन्हं आढळल्याचं म्हटलं नाही.
खरं की खोटं... वडिलांच्या प्रत्येक दाव्याची चौकशी; रात्रीच घाईघाईत केले ३ बहिणींचे अंत्यसंस्कार
तनुच्या म्हणण्यानुसार, मुलींनी जीव देण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. त्यात त्यांनी आपले वडील चेतन गुर्जर यांची माफी मागत लिहिलं होतं की, "पप्पा सॉरी, आम्ही कोरिया सोडू शकत नाही. कोरिया आमचं आयुष्य आहे, कोरिया आमचा जीव आहे. तुम्ही आम्हाला यापासून दूर करू शकत नाही. आय एम सॉरी, आम्ही आमचा जीव देत आहोत."
छत्तरपूर येथे राहणारा तनू आपल्या आईसोबत पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी पोहोचला होता. त्याने सांगितले की, दोघेही नोकरी करत असल्याने त्याचं चेतन गुर्जर यांच्या कुटुंबाशी वारंवार बोलणं होत नसे. त्यांची शेवटची भेट केवळ लग्न समारंभातच झाली होती. तनूची आई जेव्हा घराच्या आत कुटुंबाला भेटायला गेली, तेव्हा तिथलं वातावरण इतकं विचित्र होतं की त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्या लगेच बाहेर आल्या.
"आम्हाला कोरियाला घेऊन चला, तिथल्या शाळेत..."; ३ मुली गमावलेल्या वडिलांचा खळबळजनक दावा
"तुम्ही आम्हाला कोरियन कल्चरपासून..."; ३ बहिणींनी शेवटच्या 'नोट'मध्ये काय लिहिलं?
मुलींचे वडील चेतन गुर्जर, जे स्वतःचा व्यवसाय करतात, सध्या मोठ्या धक्क्यात आहेत. कुटुंबातील इतर सदस्य आणि नातेवाईकही या भयावह घटनेतून सावरू शकलेले नाहीत. याच दरम्यान, पोलीस आता मुलींचे मोबाईल आणि त्या 'कोरियन गेम'च्या दुव्यांचा शोध घेत आहेत, ज्याने तीन निष्पाप जीवांचा बळी घेतला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.