शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

"पाकिस्तानकडून सुपारी घेतलीय..."; मौलाना शहाबुद्दीन यांच्या शमीसंदर्भातील विधानावरून चक्रपाणी महाराज भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 18:37 IST

मोहम्मद शमीने सामन्यादरम्यान रोजा न धरून चूक केल्याचे मौलाना शहाबुद्दीन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर, अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांची प्रतिक्रिया आली आहे.

भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीने रोजा काळात मैदानावर एनर्जी ड्रिंक घेतल्याने बरेलीचे मौलाना शहाबुद्दीन यांनी त्याच्या संदर्भात केलेल्या एका विधानाने वाद निर्माण झाला आहे. मोहम्मद शमीने सामन्यादरम्यान रोजा न धरून चूक केल्याचे मौलाना शहाबुद्दीन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर, अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांची प्रतिक्रिया आली आहे.

स्वामी चक्रपाणी महाराज म्हणाले, "मौलाना यांच्या भारतीय क्रिकेटर शमी विरोधातील रोजा न धरण्यासंदर्भात करण्यात आलेल्या विधानावरून, असे जाणवते की, पाकिस्तानच्या इशाऱ्यावर, सुपारी घेऊन, भारतीय संघाला हरवण्यासाठी मानसिक त्रास देण्याच्या हेतूने, अशा प्रकारचे भाष्य केले जात आहे. अशा मौलानाला अटक करून चौकशी करायला हवी पाकिस्तानकडून किती रुपये घेऊन काम करत आहेत."

मला वाटते, तो देशासाठी खेळत असल्याचे पाहून अल्लाह देखील खुश होतील -यासंदर्भात माधवी लता यांनीही संबंधित मौलानावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, "माझा मौलाना साहेबांना प्रश्न आहे की, ते (शमी) एक क्रिकेटर आहेत आणि मैदानावर भारताला विजय मिळवून देण्यासाठी स्वतःला तयार ठेवणे, ही त्यांची जबाबदारी आहे. जर देशाप्रति कुणी आपले कर्तव्य पार पाडत असेल, तर मौलानांचा त्यावर आक्षेप का? मला वाटते, तो देशासाठी खेळत असल्याचे पाहून अल्लाह देखील खुश होतील." एवढेच नाही, तर मौलानांवर निशाणा साधताना माधवी लता म्हणाल्या, की स्वतः क्रिकेट का बघत होते. कारण, रमजान सुरू असताना त्यांनी एंटरटेनमेंटपासून दूर रहायला हवे."

माधवी लता पुढे म्हणाल्या, "मी तर म्हणेन की, धर्म ही एक वैयक्तिक बाब आहे. जर मौलाना म्हणाले असते की, भारतासाठी खेळताना एका क्रिकेटरने एवढे काम केले आहे. तर आम्हाला आनंद वाटला असता."

काय म्हणाले होते मौलाना? -बरेलीचे मौलाना शहाबुद्दीन रिझवी शमी संदर्भात बोलताना म्हणाले, रोजा न धरून शमीने मोठा गुन्हा  केला आहे. इस्लाममध्ये रोजा धरणे हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे. यामुळे शरियतनुसार शमी गुन्हेगार ठरतो, अशा आशयाचे वक्तव्य करत संबंधित मौलाना यांनी शमीवर निशाणा साधला आहे. मोहम्मद शमीच्या ज्या फोटोवरून या वादाला सुरुवात झालीये तो फोटो भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल मॅच वेळचा आहे. या सामन्यात मोहम्मद शमीनं टीम इंडियाकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

टॅग्स :Mohammad Shamiमोहम्मद शामीIndian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघChampions Trophyचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५