नवी दिल्ली - आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा कायद्याच्या तावडीतून सुटू शकणार नाहीत. त्यांच्या विरोधात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची चौकशी होणे आवश्यक असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले.
आसामचे मुख्यमंत्री देशातील सर्वांत भ्रष्ट मुख्यमंत्री असल्याचा आरोप करून राजकीय विरोधकांना तसेच टीकाकरांना त्रास देण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करणे संविधानाच्या विरोधात असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. अशा प्रकरणात काँग्रेस पक्ष पवन खेरा यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत पोस्ट करून राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सरमा यांच्याबाबत प्रश्नांचे जे वादळ उठले आहे, त्याचा कसून तपास होणे आवश्यक आहे. पारदर्शकता, सत्तेचे उत्तरदायित्व व कायद्याचे शासन हेच संवैधानिक मूल्यांचे खरे आधार आहेत.
भाजपचा पलटवारराहुल गांधी हे 'प्रतिशोधाचे राजकारण' करत असून बनावट कागदपत्रांच्या आधारे 'राजकीय हत्या' करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसचे पवन खेरा यांनी सादर केलेली कागदपत्रे 'बनावट' आणि राहुल गांधींनी 'प्रायोजित' केलेली असल्याचे म्हटले आहे. हे कागदपत्र बनावट असून ते दुसऱ्याच्या नावावर आहेत, असे पूनावाला म्हणाले.
प्रकरण काय? पवन खेरा यांनी ५ एप्रिल रोजी आरोप केला होता की, मुख्यमंत्री सरमा यांच्या पत्नी रिंकी यांच्याकडे संयुक्त अरब अमिरात, इजिप्त आणि अँटिगुआचे पासपोर्ट आहेत. दुबईमध्ये दोन मालमत्ता तसेच अमेरिकेत डमी कंपन्यांमध्ये अनेक मालमत्ता आहेत. मुख्यमंत्री सरमा यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात याचा उल्लेख केलेला नाही.
सरमा यांनी फेटाळले होते आरोपसरमा आणि त्यांच्या पत्नीने आरोप फेटाळले होते. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने खेरा यांच्या विरोधात आसाम पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी खेरा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी कसून तपासणी केली होती.
Web Summary : Rahul Gandhi demands probe into Assam CM Sarma's alleged corruption. BJP accuses Gandhi of political vendetta. Allegations include undisclosed foreign assets. Sarma denies claims.
Web Summary : राहुल गांधी ने असम के मुख्यमंत्री सरमा के कथित भ्रष्टाचार की जांच की मांग की। भाजपा ने गांधी पर राजनीतिक प्रतिशोध का आरोप लगाया। आरोपों में अघोषित विदेशी संपत्ति शामिल है। सरमा ने आरोपों का खंडन किया।