शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Arvind Kejriwal : "प्रत्येक संकटाचं ओझं जनतेवरच का लादलं जातं?"; मोदींच्या विधानावर केजरीवालांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 17:55 IST

Arvind Kejriwal And Narendra Modi : आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मध्य पूर्वेतील संकटाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेल्या विधानावर केजरीवाल यांनी जोरदार पलटवार केला. "प्रत्येक संकटाचं ओझं जनतेवरच का लादलं जातं? या सरकारच्या अपयशाची किंमत सामान्य माणसालाच का मोजावी लागते?" असा सवाल देखील विचारला आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत पोस्ट केली आहे. "मध्य पूर्वेतील युद्धामुळे निर्माण झालेलं संकट हाताळण्यात मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. शेअर बाजार कोसळत आहे, एलपीजीच्या तुटवड्यामुळे अनेक व्यवसाय बंद पडले आहेत, लोक कडाक्याच्या उन्हात सिलिंडरसाठी रांगा लावत आहेत, स्थलांतरित कामगारांच्या उदरनिर्वाहाचं साधन हिरावलं गेलं आहे आणि रुपयाने नीचांकी पातळी गाठली आहे."

"युद्ध कधीही सुरू होऊ शकतं हे संपूर्ण जगाला माहित होतं. मग मोदी सरकारची कोणतीही तयारी का नव्हती? आधीच पुरेशी व्यवस्था का केली गेली नाही आणि पर्यायी पुरवठा का सुनिश्चित केला गेला नाही? प्रत्येक संकटाचं ओझं अखेर जनतेवरच का लादलं जातं? या सरकारच्या अपयशाची किंमत सामान्य माणसालाच का मोजावी लागते?" असं म्हणत केजरीवाल यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

पंतप्रधानांनी सरकार या संकटांना तोंड देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगत प्लॅन बीही सांगितला. मध्य पूर्वेतील संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक आहे. कच्चे तेल, आवश्यक गॅसचा बहुतांश पुरवठा याच मार्गाने येतो. परंतु युद्धामुळे स्ट्रेट होर्मुझमधून टँकर आणणं आव्हानात्मक बनलं आहे. 

भारतात क्रूड, गॅसपासून खतांची आयातही याच देशातून होते. LPG ची ६० टक्के आयातही केली जाते. व्यावसायिक जहाजांवर हल्ला आणि होर्मुझमधील अडथळा मंजूर नाही. सरकार या मार्गावरून भारतीय जहाजांना सुरक्षितपणे वाहतूक करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तिथल्या प्रत्येक परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. सरकार पूर्णत: सतर्क मोडला आहे असंही त्यांनी सांगितलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Kejriwal slams Modi, questions burden of crisis on citizens.

Web Summary : Arvind Kejriwal criticizes Modi government's handling of the Middle East crisis, questioning why citizens bear the brunt of its failures, citing market crashes and LPG shortages. Modi assures efforts to secure supply routes.
टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीAAPआपWarयुद्धBJPभाजपाLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाई