शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 06:02 IST

आयसीसीएफएमचा इशारा; तर मोठे आंदोलन करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अमेरिकेबरोबर होणाऱ्या व्यापारी करारातून शेतीविषयक सर्व मुद्दे वगळावेत, अशी मागणी इंडियन को-ऑर्डिनेशन कमिटी ऑफ फार्मर्स मूव्हमेंट्स (आयसीसीएफएम) या संघटनेने केंद्र सरकारकडे केली आहे. 

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, तामिळनाडू आदी राज्यांतील शेतकरी संघटनांमध्ये समन्वय साधण्याचे काम आयसीसीएफएम करते. या संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेशी करावयाच्या व्यापार करारात केंद्र सरकारने भारतीय शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणाऱ्या गोष्टींचा अंतर्भाव केल्यास त्याविरोधात मोठे आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे सरकारने या कराराची बोलणी करताना योग्य ती दक्षता घ्यायला हवी. 

आयसीसीएफएमने केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आणताना ते करमुक्त ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अमेरिकेचे कृषी उत्पादनांच्या व्यापारातील तोट्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. त्यामुळे अमेरिका आपली कृषी उत्पादने भारतासारख्या देशांतील बाजारपेठेत पाठविण्याची शक्यता आहे. 

भारतीय शेतकऱ्यांना फटका
आयसीसीएफएमने म्हटले की, अमेरिकेत सोयाबीनच्या निर्यातीतून २०२२ साली ३४.४ अब्ज डॉलर इतकी उलाढाल झाली. हेच प्रमाण २०२४ मध्ये २४.५ अब्ज डॉलर इतके कमी झाले. त्यामुळे अमेरिकेची कृषी उत्पादने मोठ्या प्रमाणावर भारतात दाखल झाली व ती करमुक्त केल्यास भारतीय शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीAmericaअमेरिका