शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

इंजिन फेल की आणखी काही? एअर इंडिया विमान अपघाताच्या तपासात मोठा खुलासा, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:45 IST

Air India Plane Crash: एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण तपासात इंजिनमध्ये बिघाड आणि अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याचा संशय आहे.

Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाविमानअपघाताला दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. त्या अपघातातविमानातील २४२ जणांपैकी फक्त एकाचा जीव वाचला, तर उर्वरित सर्वांचा मृत्यू झाला. अद्याप या अपघाताचे स्पष्ट कारण समोर आले नाही. दरम्यान, तपासात असे दिसून आले आहे की, अपघाताचे एक प्रमुख कारण दोन्ही इंजिनमधील बिघाड असू शकतो. 

तपासात काय आढळले?मीडिया रिपोर्ट्सनुसार, तपासकर्त्यांनी आणि एअर इंडियाच्या वैमानिकांनी सिम्युलेटरमध्ये त्या अपघाताच्या परिस्थितीची पुनरावृत्ती केली. त्यांनी पाहिले की, लँडिंग गियर उघड्यानंतर, ते परत बंद करताना विमान कोसळू शकते का? परंतु सिम्युलेटर चाचणीत असे आढळून आले की, केवळ या कारणांमुळे विमान कोसळत नाही.

इमर्जन्सी पॉवर सिस्टिमने दिला इशारा अपघातापूर्वी विमानातील आपत्कालीन पॉवर टर्बाइन आपोआप सुरू झाले होते. जेव्हा विमानाचे दोन्ही इंजिन काम करणे थांबवतात, तेव्हाच ही सिस्टीम चालू होते. त्यामुळे अपघाताच्या वेळी विमानातील संपूर्ण वीजपुरवठा बंद झाल्याचा संशय आणखी वाढला आहे. यावरुन इंजिन किंवा पॉवर सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे दिसून आले.

विंग फ्लॅप्स आणि लँडिंग गियरवर शंकाव्हिडिओ फुटेजमध्ये असे दिसून आले की, विमान टेकऑफनंतर उंचीवर जाण्याऐवजी थेट कोसळले. सिम्युलेटर चाचण्यांमध्ये असे दिसून आले की लँडिंग गियर अर्धा दुमडलेला होता परंतु त्याचे दरवाजे उघडले नाहीत, जे हायड्रॉलिक बिघाड किंवा वीज पुरवठा बिघाड दर्शवते.

तपासकर्त्यांनी काय म्हटले?आतापर्यंत एएआयबी (विमान अपघात तपास ब्युरो) आणि एअर इंडियाने अधिकृतपणे काहीही सांगितले नाही, परंतु सूत्रांनुसार अपघाताचे कारण आता तांत्रिक बिघाडाकडे वळले आहे. ब्लॅक बॉक्स (फ्लाइट रेकॉर्डर) च्या डेटाची तपासणी अजूनही सुरू आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर आणखी माहिती समोर येईल. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघातGujaratगुजरात