शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 00:27 IST

Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व मृतदेह आणण्यात आले आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली.

अहमदाबादमधीलएअर इंडियाच्या विमान अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादचे पोलीस उपायुक्त कानन देसाई यांनी ही माहिती दिली आहे. विमानामध्ये एकूण २४२ जण प्रवास करत होते, त्यापैकी एक ब्रिटीश नागरिक चमत्कारीकरित्या बचावला आहे. देसाई यांनी सांगितलेला आकडा हा विमानातील प्रवाशांपेक्षाही खूप जास्त आहे. यामुळे यात बीजे मेडिकल कॉलेजच्या इंटर्न डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे. 

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व मृतदेह आणण्यात आले आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली. विमान समुद्रसपाटीपासून ६२५ फूट उंचीवर गेल्यावर इंजिन बंद पडले आणि विमान खाली कोसळले. विमानतळावरून उड्डाण केल्याने विमानतळाची हद्द ओलांडून विमान पुढे गेले होते. रहिवाशी भागात असलेल्या बीजे मेडिकल क़ॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीवर हे विमान आदळले. 

यावेळी कॉलेजचा लंच ब्रेक झालेला होता. यामुळे सर्व इंटर्न डॉक्टर जेवण करण्यासाठी आले होते. त्यांच्यावरच हे विमान आदळल्याने मृतांचा आकडा वाढला आहे. जवळपास २० डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते. परंतू, एकूण मृतांचा आकडा विमानातील प्रवाशांपेक्षा २४ ने वाढला आहे. यात आणखी वाढ होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबाद