शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशनंतर 'हरियाणा'तही टॅक्स फ्री, शूरवीर 'तानाजीं'च्या महाराष्ट्रात कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 17:44 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमधील शूरवीर तानाजी मालुसरेंच्या कोंढाणा किल्ल्याची शौर्यगाथा

मुंबई - अभिनेता अजय देवगन, सैफ अली खान आणि काजोल स्‍टारर सिनेमा 'तानाजी: द अनसंग वॉरियर' आणि दीपिका पादुकोण स्‍टारर 'छपाक' रूपेरी पडद्यावर एकाच दिवशी रसिकांच्या भेटीला आले. दोन्ही सिनेमाने आतापर्यंत चांगली कमाई केली असली तर यांत तानाजीने कमाईच्या बाबतीत छपाकला मागे टाकले आहे. तानाजी चित्रपटाने 2020  मधील 100 कोटींचा टप्पा गाठणारा पहिला चित्रपट म्हणून मान मिळणार आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने राज्यात तानाजी चित्रपट करमुक्त केला होता. त्यानंतर, आता हरियाणातील भाजपा सरकारनेही तानाजी चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमधील शूरवीर तानाजी मालुसरेंच्या कोंढाणा किल्ल्याची शौर्यगाथा तानाजी चित्रपटाच्या माध्यमातून 70 मिमी पडद्यावर आली आहे. कोंढाणा किल्ला घेताना धारातिर्थी पडलेल्या तानाजी यांच्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे म्हटले होते. त्यानंतर, कोंढाणा या किल्ल्यास सिंहगड असे नाव देण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ला म्हणून सिंहगड गणला जातो. महाराष्ट्राच्या रणभूमीत तानाजी मालुसरेंनी पराक्रम गाजवला. त्यामुळे, अजय देवगणची भूमिका असलेला तानाजी चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा, अशी मागणी होत आहे. त्यातच, उत्तर प्रदेश आणि हरयाणातील भाजपा सरकारने तानाजी चित्रपट टॅक्स फ्री (करमुक्त) केला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी तानाजी चित्रपट करमुक्त करण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यामुळे, तानाजी चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होईल, असेच दिसून येते. मात्र, महाराष्ट्र सरकारने अद्याप याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे, छत्रपतींच्या महाराष्ट्रात हा चित्रपट कधी करमुक्त होणार, अशी भूमिका सोशल मीडियावरुन नेटीझन्स घेत आहेत.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही महसूलमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तानाजी चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश आहे. सध्या, तानाजी अन् छपाक चित्रपटावरुन देशात राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेससह डाव्या पक्षांकडून छपाकला समर्थन देण्यात येत आहे, तर भाजपाकडून तानाजी चित्रपटाला पाठिंबा मिळत आहे

टॅग्स :Tanaji MovieतानाजीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbaiमुंबईHaryanaहरयाणा