शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

महापौर महाशिवआघाडीचा? नाशिकच्या 'मनसे' नेत्यांची 'राज दरबारी' खलबतं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 12:50 IST

सध्या नाशिक महापालिकेत मनसेचे अवघे 5 नगरसेवक आहेत. 65 नगरसेवकांसह भाजपचे पूर्ण बहुमत आहे.

नाशिक - नाशिकच्यामहापौरपदाबाबत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी खलबते सुरू झाली असून राज नाशिकच्या बाबतीत काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. मनसेचे नेते डॉ प्रदीप पवार, माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी गटनेते सलीम शेख आणि जिल्हा प्रमुख अनंता सूर्यवंशी हे आज सकाळी नाशिकमधून राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत रवाना झाले होते. आता ते राज यांच्या निवासस्थानी पोहोचले असून नाशिकच्या महापौर पदाबाबत खलबते सुरू झाल्याची माहिती आहे.

सध्या नाशिक महापालिकेत मनसेचे अवघे 5 नगरसेवक आहेत. 65 नगरसेवकांसह भाजपचे पूर्ण बहुमत आहे. मात्र, राज्याप्रमाणेच नाशिक मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, मनसे आणि अपक्ष एकत्र आले तर महाशिवआघाडी भाजपला आव्हान देऊ शकते. भाजपचे काही नाराज नगरसेवक फुटीच्या तयारीत असल्याचे सांगितले जात असून त्यामुळे विरोधकांचे मनोबल वाढले आहे. नाशिकमध्ये आज शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी बैठक होत असताना दुसरीकडे मात्र नाशिक मनसेचे पदाधिकारी राज दरबारी गेले आहेत.

नाशिक महापालिकेच्या 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेचे 40 नगरसेवक होते आणि पहिला महापौर म्हणून  ऍड यतीन वाघ यांची त्यांनी भाजपच्या पाठिंब्यानेच निवड केली होती. तर, याच पंचवार्षिक मध्ये  दुसऱ्या अडीच वर्षात नाशिक महापालिकेत भाजप आणि शिवसेना यांची युती झाली आणि मनसेला दूर ठेवण्यासाठी लढत देण्यात आली त्यावेळी मनसेला काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी साथ दिल्याने पुढील अडीच वर्षे मनसेचे अशोक मुर्तडक हे महापौर होऊ शकले होते. त्यामुळे राज यांना भाजप आणि विरोधकांनी सारखीच मदत केली असल्याने आता राज नक्की काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :NashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसRaj Thackerayराज ठाकरेMayorमहापौरMNSमनसे