शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
9
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
10
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
11
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
12
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
13
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
14
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
15
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
16
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
17
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
18
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
19
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
20
​मुख्यमंत्र्यांचा उल्लेख 'जॉन अब्राहम' म्हणून करत, अमित ठाकरेंची व्हीआयपी संस्कृतीवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या योग विद्यापीठाचा ‘योग’ कधी येणार? दहा वर्षांपूर्वी झालेल्या निर्णयाची अद्याप प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 11:22 IST

१० वर्षं उलटून गेल्यावरही नाशिकमध्ये योग विद्यापीठ उभारणीची अद्याप प्रतीक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक: योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे २०१५ मध्ये देशात योग विद्यापीठ स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी केंद्रासह राज्यातही भाजप युतीचे सरकार होते. १० वर्षं उलटून गेल्यावरही नाशिकमध्ये योग विद्यापीठ उभारणीची अद्याप प्रतीक्षा आहे.

धार्मिक, नैसर्गिक, भौगोलिक महत्त्व लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर किंवा इगतपुरी तालुक्यात योग विद्यापीठाची स्थापना करावी, अशी मागणी नाशिककरांतर्फे तत्कालीन केंद्रीय आयुष राज्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली होती. मुंबईत त्यासंदर्भात ‘मेक इन नाशिक’ उपक्रमाच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडेही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर केवळ आश्वासने मिळाली. प्रस्तावानंतर तब्बल १० वर्षांचा कालावधी उलटूनही योग विद्यापीठाचे स्वप्न पूर्ण होण्याची अद्यापही प्रतीक्षा आहे. 

राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत नाशिकची आरोग्यदायी हवा, मुबलक पाणी अन्य शहरांच्या तुलनेत कमी प्रदूषण असल्याने योग विद्यापीठासह वेलनेस सेंटर उभारणे शक्य असल्याचा प्रस्तावही देण्यात आला होता.  त्यानंतर इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरात वेलनेस सेंटर उभारण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाकडून घोषणा झाली. गत पंचवार्षिकमध्येही वेलनेस सेंटरचा प्रस्ताव देण्यात येऊन तो रेंगाळलेला आहे.

का होतोय विलंब?
पर्यटन विभागाला जागा मिळत नसल्याने विलंब होत असल्याचे कारण दिले जात आहे. राज्याचे तत्कालीन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी त्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, त्यानंतरही गाडी पुढे सरकली नाही. नाशिकमध्ये सर्वसमावेशक असे आंतरराष्ट्रीय योग विद्यापीठ, वेलनेस सेंटर निर्माण झाल्यास नाशिक आणि महाराष्ट्राच्या लौकिकात निश्चितच भर पडेल. आंतरराष्ट्रीयदृष्ट्यादेखील तो देशाच्या अभिमानाचा मानबिंदू ठरू शकेल.  

टॅग्स :Yogaयोगासने प्रकार व फायदेMaharashtraमहाराष्ट्रNashikनाशिक