शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

एमपीए संचालकपदी बुराडे; ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी दराडे

By admin | Updated: April 29, 2017 01:57 IST

नाशिक :सरकारने राज्य पोलीस सेवा व भारतीय पोलीस सेवेतील विशेष पोलीस महानिरीक्षक, अपर अधीक्षक संवर्गातील १३१ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत़

नाशिक : राज्य सरकारने पोलीस विभागात मोठे फेरबदल केले असून, त्यामध्ये राज्य पोलीस सेवा व भारतीय पोलीस सेवेतील विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, उपआयुक्त, अपर अधीक्षक संवर्गातील १३१ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत़ नाशिक जिल्ह्णातील आठ अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यामध्ये ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी संजय दराडे यांची तर महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालकपदी प्रशांत बुराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ याबरोबरच नाशिक शहरातील तीन पोलीस उपायुक्तांची बदली करण्यात आली आहे़राज्याच्या गृहविभागाने गुरुवारी (दि़२७) रात्री उशिरा या बदल्यांचे आदेश काढले़ महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक नवल बजाज यांची कोकण परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी तर कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुराडे यांची महाराष्ट्र पोलीस अकादामीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे़ ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांची नागपूरच्या उत्तर प्रादेशिक विभागाच्या अपर आयुक्तपदी तर नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संजय दराडे यांची नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे़शहर पोलीस आयुक्तालयातील तीन पोलीस उपआयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असून, पोलीस उपायुक्त विजय पाटील (प्रशासन) यांची नागपूरच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक, पोलीस उपआयुक्त दत्तात्रेय कराळे (गुन्हे) यांची जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी तर परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांची अमरावती पोलीस आयुक्तालयात उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे़ नाशिक ग्रामीणमधील मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची नागपूरला उपायुक्तपदी, महाराष्ट्र पोलीस अकादमीतील अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांची सोलापूर, श्याम घुगे यांची खामगाव, रोहिदास पवार यांची श्रीरामपूर येथे अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)