शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणाचे शुद्धीकरण आजची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 01:11 IST

ओझर टाउनशिप : राजकारणाचे शुद्धीकरण आजच्या काळाची गरज असून, राजकारणातला सेवाभाव लुप्त पावला आहे. जनतेचा सेवक स्वत:ला मालक समजू लागला आहे. मालकी दृष्टिकोन आला की तेथे भ्रष्टाचार सुरू होतो. आपल्या देशाला सर्वाधिक शक्तिशाली बनवायचे असेल तर खऱ्या लोकशाहीचे दर्शन घडवावे लागेल त्यासाठी राजकारणाचे शुद्धीकरण गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केले.

ठळक मुद्देशांतीगिरीजी महाराज : म्हाळसामाता धर्मसंस्कार सोहळ्याची सांगता

ओझर टाउनशिप : राजकारणाचे शुद्धीकरण आजच्या काळाची गरज असून, राजकारणातला सेवाभाव लुप्त पावला आहे. जनतेचा सेवक स्वत:ला मालक समजू लागला आहे. मालकी दृष्टिकोन आला की तेथे भ्रष्टाचार सुरू होतो. आपल्या देशाला सर्वाधिक शक्तिशाली बनवायचे असेल तर खऱ्या लोकशाहीचे दर्शन घडवावे लागेल त्यासाठी राजकारणाचे शुद्धीकरण गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केले.जनार्दनस्वामी मौनगिरी महाराज यांच्या मातोश्री म्हाळसामाता यांच्या पुण्यतिथीनिमित्त ओझरच्या जनशांतिधाम येथे सुरू असलेल्या जय म्हाळसामाता धर्मसंस्कार सोहळ्याची रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. यावेळी उपस्थित भाविकांना धर्म उपदेश करताना स्वामी शांतिगिरी महाराज बोलत होते. यावेळी त्यांनी बाबाजींच्या अनेक आठवणी सांगीतल्या. जगद्गुरू बाबाजींच्या दिव्य परंपरा समाजासाठी वरदानकारी ठरत असून जपानुष्ठानाच्या माध्यमातून भाविकांच्या जीवनाला योग्य दिशा मिळत आहे. प्रत्येकाने आपापला धर्म पाळावा. पती आणि पत्नी संसररूपी रथाची दोन चाके असून यापैकी एकानेही असहकार दाखवला तर काय होईल ? म्हणून एकविचाराने संसार करा, अध्यात्माची , संत- संगतीची जोड असल्यास संसार आनंदी होऊ शकतो. असेही ते म्हणाले. राहुल शिंदे यांनी सदगुरु भक्तीपर गीते सादर करूण भाविकांना मंत्रमुग्ध केले. गायक रोशन बागल यांनीही सलग आठवडाभर भक्तीगीतांची सेवा केली. लक्षवेधी पालखी मिरवणूक आकर्षणाचे केंद्र ठरले. स्वामी शांतिगिरीजी महाराज मिरवणुकीत सहभागी झाल्याने भाविकांचा उत्साह वाढला. यावेळी हजारो महिलांच्या जपानुष्ठानाची सांगता जय बाबाजींच्या प्रचंड जयघोषात झाली.  यावेळी जनशांती धामातील देवीदेवतांच्या आणि बाबाजींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.