शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

दारणाकाठावर पुन्हा बिबट्यांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:38 IST

लॉकडाऊनकाळात बिबट्यांच्या दहशतीने दारणाकाठ थरारला होता. या भागात बिबट्यांचा मुक्त संचार अन‌् मानवी हल्ल्यांनी स्थानिक रहिवाशांसह वनविभागाचीही झोप उडविली ...

लॉकडाऊनकाळात बिबट्यांच्या दहशतीने दारणाकाठ थरारला होता. या भागात बिबट्यांचा मुक्त संचार अन‌् मानवी हल्ल्यांनी स्थानिक रहिवाशांसह वनविभागाचीही झोप उडविली होती. सुमारे डझनभर बिबटे दारणा काठालगतच्या नाशिक तालुक्यातील विविध गावांमधून जेरबंद करण्यात आले होते.

दरम्यान, शिलापूर, जाखोरी, सामनगाव, पळसे, चाडेगाव, एकलहरे, बेलतगव्हाण, शेवगेदारणा, संसारी, दोनवाडे, लॅमरोड, वडनेर, या परिसरात बिबट्यांचा वावर पुन्हा वाढत असल्याच्या तक्रारी वनविभागाला प्राप्त होऊ लागल्या आहे. बिबट्याकडून पशुधनाची हानी करण्यात आल्याच्याही घटना घडल्याने नागरिकांकडून या भागात पिंजरे लावून वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. ऊसतोडीचा हंगाम असल्यामुळे बिबट्यांची सुरक्षित आश्रयास जागा संपुष्टात येऊ लागली आहे. त्यामुळे लपण आणि भक्ष्याच्या शोधात भटकंती करताना बिबटे परिसरातील शेतकरी, शेतमजुरांना नजरेस पडत असल्याने बिबट-मानव संघर्षाला निमंत्रण मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

---इन्फो---

पंधरवड्यात अशी झाली पशुधनाची हानी

चाडेगाव, सामनगावामध्ये वासरांवर बिबट्याने हल्ला करुन ठार केले. त्यानंतर पळसे गावात गाय, वासरु आणि शेळीवर बिबट्याने सलग तीन दिवसांत हल्ला चढविला. त्यानंतर

बेलतगव्हाणमध्येही एक शेळी आणि वासराची बिबट्याने शिकार केली. वडनेर रोड परिसरातही बिबट्याने शेळी फस्त केल्याची तक्रार वनविभागाकडे आहे.

---इन्फो--

गाळप हंगाम अन‌् ऊस शेती संपुष्टात

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील ऊस शेती गाळप हंगामामुळे संपुष्टात आली आहे. यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी कमी झाल्याने बिबटे उघड्यावर नागरिकांच्या नजरेस पडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर रात्री उशिरापर्यंत बिबट्यांचे दर्शन या भागातील मळे परिसरात होते असे नागरिकांचे म्हणणे आहे.

--इन्फो--

गेल्या महिन्यात तीन बिबटे जेरबंद

जानेवारी महिन्यात ९ तारखेला पाथर्डी शिवारातील डेमसे मळ्यात बिबट्या जेरबंद झाला तर १४ तारखेला गांधीनगरच्या कॅट‌्समध्ये एक बिबट्या आणि ३१ जानेवारी रोजी तिसरा बिबट्या सामनगावात पिंजऱ्यात अडकला.

-----------

०२फॉरेस्ट नावाने फोटो आर वर सेव्ह आहे.

बिबट्याचा फाईल फोटो वापरावा