शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोनई हत्याकांडातील कैद्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 01:01 IST

राज्यभर गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील सोनाई येथील तिहेरी हत्याकांडात फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैदी पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले याचा शनिवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

नाशिकरोड : राज्यभर गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील सोनाई येथील तिहेरी हत्याकांडात फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैदी पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले याचा शनिवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे २०१३ मध्ये झालेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी संशयित पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले याला ५ जानेवारी २०१३ साली  अटक झाली होती. त्यानंतर नाशिकच्या सत्र न्यायालयाने २० जानेवारी २०१८ रोजी फाशीची शिक्षा ठोठावली होती.  गेल्या जानेवारी महिन्यापासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा सुनावलेला पोपट दरंदले शिक्षा भोगत होता. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. चार दिवसांपूर्वी त्याला हृदयविकारचा त्रास जाणवू लागल्याने जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. दरंदलेवर उपचार सुरू असताना शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन  झाल्याचे कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी सांगितले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :jailतुरुंगDeathमृत्यू