शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा, फेरफार नोंदीचे काम बंद

By admin | Updated: November 13, 2016 01:02 IST

तलाठ्यांचे आंदोलन : नागरिकांचे हाल

नाशिक : तीन दिवसांपूर्वी राज्य पातळीवर धरणे आंदोलन केल्यानंतरही शासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचे पाहून तलाठी संघटनेने अखेर सातबारा व फेरफार नोंदीचे काम करणाऱ्या संगणकाचे डिजिटल सिग्नेचर सिस्टीम म्हणजेच संगणकाची कळच गुरुवारी तहसीलदारांना सुपूर्द केल्याने संपूर्ण राज्यात सातबारा उताऱ्याचे वितरण तसेच फेरफार नोंदीची कामे ठप्प झाली आहेत. शासन पातळीवर गेल्या दोन दिवसांत काहीच तोडगा निघालेला नसल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.तलाठी सजांची पुनर्रचना व मंडळ कार्यालयांची निर्मिती करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह दैनंदिन कामकाज करताना तलाठ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यात यावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तलाठी संघटना राज्यपातळीवर आंदोलन करीत असून, शासनाने वेळोवेळी निव्वळ आश्वासने दिली, परंतु त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे ३१ आॅक्टोंबरनंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याचाच भाग म्हणून दि. ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान तलाठी संघटनांनी काळ्याफिती लावून कामकाज केले, त्यानंतर सोमवारी राज्यभर लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले. शासनाने त्याची दखल न घेतल्याने दि. १० रोजी सर्व तलाठ्यांनी संगणकाची कळ तहसीलदारांकडे सुपूर्द केली आहे. सध्या सातबारा उताऱ्याचे संगणकीकरण झाले असून, जमीनविषयक व्यवहारांच्या नोंदी म्हणजेच फेरफारदेखील संगणकावरच केले जात आहे. ही दोन्ही कामे संगणकावरच केली जात असून, ते करण्यासाठी प्रत्येक तलाठ्यास डिजिटल स्वाक्षरीची सोय संगणकातच उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता आंदोलनात तलाठ्यांनी ही सोयच तहसीलदारांकडे सोपविली आहे. त्यामुळे संगणकांवर केली जाणारी सर्व कामे ठप्प झाली आहेत.