शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

खिडकी तोडून सव्वातीन लाखांची घरफोडी-नाशकातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 17:15 IST

नाशिक शहरात दिवाळीच्या काळात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे शहरातील पोलिसांच्या गस्तीपथक, बीटमार्शलसह अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. 

ठळक मुद्देनाशिक शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढलेतीन घरफोड्यांमध्ये चार लाखांचा ऐवज चोरीशहरातील सुरक्षेव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

नाशिक : शहरात द्वारका परिसरात बंद घराची खिडकी तोडून सव्वातील लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गडली असून रविशंकर मार्ग परिसरात खिडकीचे गज वाकवून तीस हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला. तर गंगापूर भागात उघड्या घरातून 50 हजार रुपये किंमतीच्या दागिन्यांची  चोरी झाल्याची माहिती रविवारी (दि.3)समोर आली आहे. शहरात दिवाळीच्या काळात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे शहरातील पोलिसांच्या गस्तीपथक, बीटमार्शलसह अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. पोलिासांनी दिलेल्या माहितीनुसार,  द्वारका परिसरात मरीमाता मंदीराशेजारी संतकबीर नगर येथे बंद घराची खिडकी तोडून चोरटयांनी तब्बल सव्वा तीन लाखांची घरफोडी केल्याची घटना घडली. याप्रकरणी दिनेश लक्ष्मण कल्याणी (२२) याने भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून  पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.डी.इंगोले करीत या घरफोडीचा तपास करीत आहे. तर दुसऱ्या घटनेतही अशाचप्रकारे खिडकीचे गज कापुन घरात प्रवेश करीत चोरटयानी कपाटातील ३० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना रविशंकर मार्ग परिसरात घडली. याभागातील प्रभु कपिटल बिल्डीग शेजारी राहणार निखील चंद्रकांत लोहार ( २८)  याने मुंबइ नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार सुहास क्षिरसागर या घरऱोडीचा तपास करीत आहे. गंगापूर, आनंदवल्ली परिसरात घडलेल्या तिसऱ्या घटनेत  चोरटयांनी ५० हजारांचा ऐवज चोरून नेला. सागरबाई बालाजी मुटकुळे ( २६)  यांच्या उघडया पत्र्याच्या घरामध्ये घुसून टीव्हीवर ठेवलेला मोबाइल, पर्समधील  सोन्याची पोत व रोख रक्कम असा एकूण ५० हजार रुपये किमचीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून  पोलीस नाइक बावीस्कर या प्रकरणाचा करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसRobberyचोरीThiefचोर