शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनी उभारणार अकरा ठिकाणी उपकेंद्रे

By admin | Updated: April 29, 2017 01:48 IST

वीज कंपनीने विजेशी संबंधित कामे त्या त्या गावात करण्याची अट घालून दिल्याने नजीकच्या काळात ग्रामीण भागात विजेच्या तक्रारी कमी होण्याची चिन्हे आहेत.

नाशिक : जिल्ह्णातील ग्रामीण भागात अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी वीज कंपनीला ठिकठिकाणी उपकेंद्रे उभारण्यासाठी लागणारी जागा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिली असली तरी, शासकीय जमिनीच्या मूल्याइतकी वीज कंपनीने विजेशी संबंधित कामे त्या त्या गावात करण्याची अट घालून दिल्याने नजीकच्या काळात ग्रामीण भागात विजेच्या तक्रारी कमी होण्याची चिन्हे आहेत. ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून वीज कंपनीने लक्ष दिलेले नसल्यामुळे विजेचे पोल मोडकळीस आले असून, काही ठिकाणी तारा जमिनीवर लोंबळण्याचे प्रकार झालेले आहेत. त्याच बरोबर रोहित्रांचीही नासधूस होऊन ते धोकादायक बनले आहेत. वीज कंपनीकडे वारंवार तक्रारी करूनही निव्वळ निधी नसल्याचे कारण देत कामे केली जात नसल्याबद्दल जिल्ह्णातील लोकप्रतिनिधींनी थेट पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडेच तक्रारी केल्या आहेत. गेल्या आठवड्यात जिल्हा खरीप हंगाम बैठकीत आमदार नरहरी झिरवाळ, जिवा पांडू गावित यांनी याप्रश्नाकडे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील विजेचे पोल अक्षरश: तुटले असून, काही ठिकाणी वीज तारांमुळे पोल उभे असल्याची तक्रार केली. वीज कंपनी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे तसेच अपघाताची शक्यता व्यक्त करण्यात आली. दुर्गम भागात वारंवार वीज खंडित होत असून, उपकेंद्रांच्या क्षमतेपेक्षा अधिक ठिकाणी वीज जोडणी दिली जात असल्यामुळे रोहित्रे नादुरुस्त होण्याचे प्रकारही घडत असल्याचे सांगितले. या संदर्भात वीज कंपनीने नवीन उपकेंद्रांसाठी अकरा ठिकाणी शासकीय जागांची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केल्याने त्यापैकी मालेगाव तालुक्यातील सायने बुद्रुक, विराणे, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डहाळेवाडी, येवला तालुक्यातील सावरगाव व सिन्नर तालुक्यातील सरदवाडी या पाच ठिकाणी शासकीय जमिनींचे हस्तांतरण करण्यात आले आहे. या जागांवर वीज कंपनीने कामे सुरू केली असून, जून अखेर कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांसमक्ष सांगण्यात आले; मात्र वीज कंपनीला शासकीय जागा एक रुपया आकारणीने देण्यात आलेली असली तरी, या शासकीय जमिनीचे शासकीय मूल्याइतकी कामे वीज कंपनीने त्या त्या भागात करणे जिल्हा प्रशासनाने बंधनकारक केले आहे. या जागांचे ताबे देताना घालून देण्यात आलेल्या अटी-शर्तींमध्येच ही बाब नमूद करण्यात आली असून, ज्या ठिकाणी शासकीय जागा वीज कंपनीने ताब्यात घेतली त्याठिकाणी विजेसंदर्भात नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मूलभूत सुविधा पुरविण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. (वार्ताहर)