मालेगाव : कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या मालेगावात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या दोन दिवसात वाढली आहे. सध्या १०१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर ७८ वरून प्रतिबंधित क्षेत्राची संख्या आता ९५ झाली आहे. ...
मालेगाव : शहरात १९२ इमारती धोकेदायक असल्याची नोंद महापालिकेकडे असली तरी या इमारतींबाबत मनपा प्रशासन उदासीन दिसून येत आहे. केवळ धोकेदायक इमारतींचे प्रभागनिहाय सर्वेक्षण करून इमारतमालकांना नोटिसा बजावण्यात मनपाने धन्यता मानली आहे. ...
पंचवटी : येथील तपोवन या धार्र्मिक पर्यटनस्थळावर एका फिरस्त्या इसमाच्या डोक्यात दगड टाकून अज्ञात संशयितांकडून हत्या करण्यात आल्याचे सोमवारी (दि.३) सकाळी उघडकीस आले. ...
अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात व्यापारी व शेतकऱ्यांसाठी शुद्ध व थंड पेयजल सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ समिती संचालक ज्ञानदेव पवार यांच्या हस्ते करण्यात आला. ...
येवला : कोरोनाने सर्वच स्तरातील उद्योगधंदे बंद पाडले आहेत. अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवावरदेखील कोरोनाचे सावट असल्याने मूर्तीकारांचा व्यवसाय मंदावला आहे. अनेक मंडळांनी यंदा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवल्यामुळे गणेशो ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील नाशिक जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची शाखा बंद करू नये, अशी मागणी सर्वतीर्थ टाकेदच्या सरपंच ताराबाई बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी आदींसह ग्रामस्थांनी केली आहे. ...
सिन्नर : शहरातील उद्योगभवन परिसरात मध्यरात्री तीन चोरट्यांनी धुमाकूळ घालत २० ते २५ हजारांचा ऐवज लंपास केला. यामध्ये रोख साडेपाच हजारासह स्टील कटिंग मशिन चोरून नेले. ...
सिन्नर : तालुक्यातील भोकणी येथील ग्रामपंचायतीने करवसुलीसाठी नवीन फंडा राबविण्यास सुरुवात केली असून, थकीत मालमत्ता करांचा १०० टक्के भरणा केल्यास गावातील शिवार रस्त्यांची मोफत दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे ...