Devotees took darshan of Mahadev from outside | भाविकांनी बाहेरूनच घेतले महादेवाचे दर्शन

भाविकांनी बाहेरूनच घेतले महादेवाचे दर्शन

ठळक मुद्दे दिवसभर भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.

नाशिक : परिसरात दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त महादेव मंदिरात भाविकांनी बाहेरून दर्शन घेतले.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सुमारे तीन महिन्यांपासून मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. दरवर्षी श्रावणी सोमवारी परिसरातील महादेव मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते तसेच पूजा अभिषेक आरती विविध धार्मिक
कार्यक्रम होतात त्यामुळे दिवसभर भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.
यंदा कोरोना महामारीमुळे मंदिर बंद आहेत. नागेश्वर महादेव मंदिर, सर्वेश्वर महादेव मंदिर, त्रिमूर्ती महादेव मंदिरसह परिसरातील मंदिराच्या बाहेरून भाविकांनी दर्शन घेतले.

Web Title: Devotees took darshan of Mahadev from outside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.