शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक निवडणूक निकाल : मध्य मतदारसंघात चालल्या सर्वाधिक ‘नोटा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 19:38 IST

Nashik Vidhansabha Election 2019भागातील २ हजार ४९३ मतदारांनी मात्र ‘ईव्हीएम’वर झळकलेल्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांपासून अपक्षांपर्यंत सर्वांनाच नाकारले. या मतदारसंघात सर्वाधिक ‘नोटा’चा वापर झाल्याचे दिसून येते.

ठळक मुद्दे२००९ साली या मतदारसंघात पहिल्यांदा परिवर्तन पहावयास मिळाले

नाशिक : मध्य मतदार संघ हा शहराचा मध्यवर्ती व गावठाण भाग असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात जुन्या नाशकातील ‘दुबई वॉर्ड’पासून तर वडाळागावपर्यंत अन् रविवारकारंजापासून इंदिरानगरपर्यंतचा भाग समाविष्ट आहे. एकूणच सुशिक्षित मतदारांपासून अशिक्षित मतदारांचेही प्रमाण या भागात अधिक आहे. येथील मतदारांनी संपुर्णपणे भाजपच्या उमेदवार विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना पुन्हा एकदा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली असली तरीदेखील या भागातील २ हजार ४९३ मतदारांनी मात्र ‘ईव्हीएम’वर झळकलेल्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांपासून अपक्षांपर्यंत सर्वांनाच नाकारले. या मतदारसंघात सर्वाधिक ‘नोटा’चा वापर झाल्याचे दिसून येते.शहरात सर्वाधिक कमी केवळ ४८ टक्के इतके मतदान या मतदारसंघात झाले होते. त्यामधून फरांदे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली तर प्रतिस्पर्धी कॉँग्रेसच्या उमेदवार हेमलता पाटील यांना ४५ हचार ६२ मते पडली. एकेकाळी हा मतदारसंघ कॉँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे अजूनही कॉँग्रेसला कौल देणारी जनता मतदारसंघात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्याचप्रमाणे २००९ साली या मतदारसंघात पहिल्यांदा परिवर्तन पहावयास मिळाले. तेव्हा राज ठाकरे यांच्या लाटेवर स्वार होऊन वसंत गीते हे येथून निवडून आले होते. त्यानंतर मात्र मनसेला या मतदारसंघात पुन्हा वर्चस्व निर्माण करता आले नाही. यंदाच्या निवडणूकीत मनसेकडून उमेदवारी करणारे नितीन भोसले यांना केवळ २२ हजार १४० मते मिळू शकली. त्या तुलनेत कॉँग्रेसने दुसरे क्रमांक राखण्यास यश मिळविले.देवळाली मतदारसंघात यावर्षी मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून आले. शिवसेनेचा बालेकिल्ला राष्टÑवादीच्या सरोज अहिरे यांनी काबीज केला. मात्र या मतदारसंघातदेखील १ हजार २४१ मतदारांनी निवडणूक रिंगणातील डझनभर उमेदवारांपैकी कोणालाही पसंती न देता थेट ‘नोटा’ची निवड केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik-central-acनाशिक मध्यdevlali-acदेवळाली