शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये तुकाराम मुंढे यांच्या समर्थनसाठी चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 18:52 IST

तुकाराम मुंढे भाजपाला का नको आहेत, पारदर्शक कारभाराला सर्व जण का घाबरतात अशा एकेक प्रश्न करीत सोशल मिडीयावर टीका सुरू आहे.

ठळक मुद्देसोशल मिडीयावर पाठींबासोशल मिडीयावर पाठींबा: विरोधकांचेही महापौरांना पत्र

नाशिक -  महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ नाशिककर सरसावले असून वॉटस गु्रप, फेसबुक सारख्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून वुई सपोर्ट मुंडे अशा हॅशटॅगवर नगरसेवकांनाच ट्रोल केले जात आहे. नगरसेवकांना भ्रष्टाचार थांबल्यानेच अस्वस्थ झालेल्या नगरसेवकांनी मुंढे हटाव मोहिम हाती घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. दुसरीकडे नागरी संघटना सक्रीय होत असतानाच मुंढे हटाव साठी सत्तारूढ भाजपाने शड्डू ठोकले असून मुंढे हटावच्या समर्थनार्थ व्यावसायिक संघटनांकडून समर्थनाची पत्रे घेण्यात आली आहेत.

नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भरमसाठ करवाढ केल्याचा ठपका ठेवून सत्तारूढ भाजपाने अन्य पक्षांच्या मदतीने अविश्वास ठराव दाखल केला आहे. येत्या शनिवारी (दि.१ सप्टेंबर) विशेष महासभा महापौर रंजना भानसी यांनी बोलावली आहे. तुकाराम मुंढे यांच्या समर्थनासाठी काही नागरीक पुढे आले असून त्यांनी वुई सपोर्ट तुकाराम मुंढे अशी मोहिम सुरू केली आहे. तुकाराम मुंढे भाजपाला का नको आहेत, पारदर्शक कारभाराला सर्व जण का घाबरतात अशा एकेक प्रश्न करीत सोशल मिडीयावर टीका सुरू आहे. सचिन मालेगावकर, जितेंद्र भाबे, जसबीर सिंंह, समाधान भारतीय यांनी लोकसंघटन सुरू केले असून सोशल मिडीयाबरोबरच प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, सत्तारूढ भाजपाने अविश्वास ठराव दाखल केल्याने त्यांनी देखील विविध व्यवसायिक संघटनांचे समर्थन मिळवणे सुरू केले आहे. त्यानुसार शिक्षण संस्था चालकांची संघटना, फेरीवाले व हॉकर्स संघटना तसेच म्युनिसीपल कर्मचारी कामगार सेना आणि शेतकऱ्यांचे समर्थन मिळवण्यासाठी मोहिम सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात अनेक संस्थांनी मुंढे हटावसाठी समर्थन दिले आहे.

येत्या शनिवारी होणा-या विशेष महासभेपूर्वी अनेक घडोमोडींची शक्यता असून शिवसेना, महाराष्टÑ नवनिर्माण सेना या बरोबरच कॉंग्रेसचे नेता शाहु खैरे यांनीही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दरवाढ रद्द केल्यास अविश्वास ठरावाला समर्थन देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढेSocial Mediaसोशल मीडिया