शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी सात तास वीज गायब

By admin | Updated: April 29, 2017 01:58 IST

मालेगाव कॅम्प : ऐन अक्षयतृतीयेच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजेपासून मालेगाव शहरात सुमारे सात तास विद्युतपुरवठा खंडित झाल्याने उन्हाच्या त्रासाने शहरवासीय त्रस्त झाले होते.

मालेगाव कॅम्प : ऐन अक्षयतृतीयेच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजेपासून मालेगाव शहरात सुमारे सात तास विद्युतपुरवठा खंडित झाल्याने उन्हाच्या त्रासाने शहरवासीय त्रस्त झाले होते. भारनियमनामुळे संताप व्यक्त करण्यात आला.अक्षयतृतीया सणाची लगबग शहरात सुरू होती. सणाच्या पार्श्वभूमीवर उत्साही वातावरण असताना सकाळी पावर गुल झाला. थोडा वेळ वाट पाहून नागरिकांनी याबाबत चौकशी सुरू केली परंतु वीज कार्यालयाचा दूरध्वनी मृतावस्थेत झाला होता. पूर्वी शुक्रवारी भारनियमन होत होते. त्यानुसार काही वेळ भारनियमन असेल अशी प्रतिक्षा होती. परंतु सायंकाळी सहा वाजता वीजपुरवठा सुरु झाला. मोतीभवन, कॅम्प परिसर, टिळकनगर, संगमेश्वर, सोयगाव, जुने सोयगाव गावठाणसह असंख्य परिसरात सणाच्या कामाच्या वेळेत वीज नसल्याने महिलांनी संताप व्यक्त केला. अक्षय तृतीयेसाठी लागणारा पुरणपोळीचा नैवैद्य प्रसाद, स्वयंपाक करण्यात महिलांची मोठी अडचण झाली होती. अनेकांनी मोतीभवन कार्यालयावर धाव घेतली परंतु समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अनेक कर्मचाऱ्यांचे मोबाईल देखील बंद होते. तांत्रिक बिघाड अथवा भारनियमन याबाबत कर्मचारी अनभिज्ञ होते. आम्ही देखील वरिष्ठ पातळीवर विचारणा करीत आहोत, आम्हाला जास्त माहित नाही असे वीज कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी अधिकच संताप व्यक्त केला. सध्या एप्रिल महिन्याचे तपमान ४३ ते ४५ अंश सेल्सीअस एवढे तापले आहे. वीज गुल झाल्यामुळे घामांच्या धारांनी शहरवासियांना त्रस्त केले व विद्युत कंपनीच्या नावाने अनेकांनी बोटे मोडली. त्यामुळे पूर्व सूचना दिल्यानंतर वीजपुरवठा बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. (वार्ताहर)