सटाणा : तालुक्यातील नवेगाव येथील शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.३) उघडकीस आली. नवेगाव येथील भावसिंग गुलाब पवार (५२) हे सततच्या नापिकीमुळे कंटाळले होते. त्या नैराश्यातून मंगळवारी राहत्या घरी त्यांनी विषारी औषध सेवन केले. त्यांच्या कुटुंबीयांनी चौकशी केली असता ते अत्यवस्थ अवस्थेत आढळून आले. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ पुढील उपचारार्थ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची सटाणा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड करीत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}