शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

एका बीट मार्शलचा मृत्यू : शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 2:59 PM

दोघा बीट मार्शल’ पोलिसांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना सोमवारी घडली होती. या घटनेत गंभीरपणे जखमी झालेल्या दोघा पोलिसांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, गुरूवारी (दि.४) पोलीस शिपाई नंदू जाधव (४०, रा.पंचवटी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

ठळक मुद्देम्हसरूळ पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना

नाशिक : द्राक्षाची वाहतूक करणाऱ्या मालवाहू भरधाव जीपने रात्रीच्या सुमारास पेठरोडवरील चौफूलीवर रात्रीच्या गस्तीवर असलेल्या दोघा बीट मार्शल’ पोलिसांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना सोमवारी घडली होती. या घटनेत गंभीरपणे जखमी झालेल्या दोघा पोलिसांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, गुरूवारी (दि.४) पोलीस शिपाई नंदू जाधव (४०, रा.पंचवटी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात पंचवटी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्तालयाच्या जवनांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. जाधव यांच्या कुटुंबियांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या दु:खात सर्व पोलीस दल सहभागी असून कुटुंबाला आर्थिक मदतीचा आधार मिळवून देण्याचा निश्चितच प्रयत्न राहणार असल्याचे आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी यावेळी शोकभावना व्यक्त करताना सांगितले.गेल्या सोमवारी (दि.१) रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास पेठरोडवरील म्हसरूळ पोलीस ठाणे अंकीत पोलीस चौकीजवळ जीपने (एम.एच १७ बीवाय ९०७०) एका मिनी टेम्पोला धडक दिल्यानंतर स्त्याच्या बाजूला दुचाकीजवळ उभ्या असलेल्या दोघा बीट-मार्शल कर्मचाऱ्यांनाही धडक दली. धडक इतकी भीषण होती की जाधव व राजेश लोखंडे हे दुरवर फेकले गेले. दरम्यान, जीप उलटली व जाधव त्याखाली सापडले गेले. दोघा पोलिसांना गंभीर जखमी अवस्थेत रात्री तत्काळ उपचारासाठी मुंबईनाका भागातील एका खासगी रूग्णालयात उपचारार्थ पोलिसांनी दाखल क रण्यात आले होते. जाधव यांच्यावर उपचार सुरू असताना गुरूवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. तर लोखंडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातात मयत झालेल्या जाधव यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. जाधव हे मागील २१ वर्षांपासून पोलीस सेवेत कार्यरत होते. पंचवटी, म्हसरूळ, पोलीस आयुक्तालयासह त्यांनी अन्य ठिकाणी सेवा बजावली. पोलीस शिपाई म्हणून भरती जाधव भरती झाले होते, ते सध्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर नोकरी करत होते. दुपारी शोकाकुल वातावरणात जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, माधुरी कांगने, पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त अशोक नखाते यांच्यासह म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनील रोहकले, गुन्हे शाखा युनिट-१चे आनंदा वाघ, बलराम पालकर, मंगलसिंह सुयर्वंशी, सुरज बिजली यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयDeathमृत्यूPoliceपोलिसAccidentअपघातVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील