शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार, समर्थक आकडेमोडीत दंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 00:24 IST

Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर सर्वच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी बूथनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी गोळा करून जय-पराजयाची गणिते मांडण्यास सुरुवात केली असली तरी, निवडणुकीचे खरे चित्र गुरुवारी (दि. २४) मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर सर्वच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी बूथनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी गोळा करून जय-पराजयाची गणिते मांडण्यास सुरुवात केली असली तरी, निवडणुकीचे खरे चित्र गुरुवारी (दि. २४) मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. तथापि, झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरूनच काहींनी हमखास विजयाचा दावाही करण्यास सुरुवात केली आहे.अतिशय चुरशीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात बदललेली राजकीय समीकरणे व आरोप-प्रत्यारोपांमुळे रंगत निर्माण झाली होती. उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचाराच्या काळात सर्वशक्तीपणाला लावत प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर सोमवारी मतदानाच्या दिवशी मतदानासाठी मतदार राजाने बाहेर पडावे यासाठी प्रयत्नही करण्यात आले. प्रत्येक उमेदवाराने जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी सकाळपासूनच आपापल्या हक्काच्या मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त केले. दुपारी मतदानाचा वेग कमी झाल्यानंतर उमेदवारांनी त्याची माहिती घेतली व कोणत्या भागातील मतदारांनी मतदान केले नाही त्यांचा शोध सुरू झाला. साधारणत: साडेचार वाजेनंतर उमेदवारांची घालमेल वाढली व मतदान कक्षात असलेल्या प्रतिनिधींकडून एकूण मतदानाची माहिती घेऊन शिल्लक राहिलेल्या मतदारांना आणण्यासाठी वाहने पाठविण्यात आली. सायंकाळी सहा वाजता मतदान आटोपल्यानंतर मात्र उमेदवारांच्या संपर्क कार्यालयावर मतदान प्रतिनिधी व बूथवरील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आपापल्या मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची आकडेवारी सादर करून त्यावरून ठोकताळे मांडण्यात आले.विविध ठिकाणची माहिती केली गोळाया निवडणुकीत कोणत्या भागातील मतदारांची मते कोणत्या उमेदवाराकडे वळाली असतील, असा अंदाजही वर्तविण्यात येऊन आपल्याला कोठून कमी-अधिक मतदान झाले असेल त्याची माहितीही गोळा करण्यातआली.मतदारसंघात कमी झालेल्या मतदानाचा फायदा-तोटा कोणाला यावरूनही उमेदवारांनी आपापल्या विजयाचे आडाखे बांधले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अद्याप तीन दिवस शिल्लक असून, तोपर्यंत सर्वच उमेदवारांची धाकधूक कायम राहणार आहे. निवडणूक निकालानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकVotingमतदानElectionनिवडणूक