शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांवर उपचारामुळे नेत्रशस्त्रक्रियांना लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST

नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात दरवर्षी तीन हजारापेक्षा अधिक नेत्ररुग्णांच्या शस्त्रक्रिया होऊन दृष्टी दिली जात होती. परंतु ...

नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात दरवर्षी तीन हजारापेक्षा अधिक नेत्ररुग्णांच्या शस्त्रक्रिया होऊन दृष्टी दिली जात होती. परंतु कोरोनामुळे या शस्त्रक्रियांना ब्रेक लागला असून २०२०-२१ या वर्षात केवळ १३८ शस्त्रक्रियाच होऊ शकल्या आहेत. कोरोनामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कामावर बोजा वाढल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

एप्रिल २०२० मध्ये पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील नेत्ररुग्ण कक्ष खुला करण्यात आला होता. या ठिकाणी गंभीर कोरोना रुग्णांना दाखल करण्यात येते. यातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्यांना जागाच शिल्लक नसल्याने जिल्ह्याचा मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा आकडा हा खालावला आहे. येत्या काळात ही संख्या वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. परंतु तूर्तास मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी थांबलेल्या सुमारे अडीच हजार ज्येष्ठांचे काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

कोरोनाबाधितांसाठी सुरुवातीपासून नेत्रकक्षाचा वापर होतो आहे. यामुळे त्याठिकाणी इतर रुग्णांना ठेवता येणार नाही. नेत्र शस्त्रक्रिया करण्यासाठी येणारे बहुतांश रुग्ण हे वृद्ध असल्याने कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. येत्या काळात स्वतंत्र व्यवस्था करण्यावर भर राहील.

-डाॅ. के. डी. सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार.

एका डोळ्यात माेतीबिंदू आहे. त्याची शस्त्रक्रिया गरजेची आहे. खासगी दवाखान्यात खर्च होतो. सिव्हिलमध्ये मोफत शस्त्रक्रिया होते. यातून बऱ्याच अडचणी दूर होतात. परंतु कोरोनाची लागण होण्याची भीती वाटते.

-यमुनाबाई ठाकरे, तळोदा,

एका डोळ्याने अंधूक दिसते. मोतीबिंदू काढायचा आहे. आता उन्हाळा असल्याने टाळले आहे. परंतु मुलांनी सिव्हीलमध्ये तपास केली असता कोरोनामुळे शस्त्रक्रिया करणे धोकादायक असल्याचे सांगितले. मोफत शिबिरही होत नाही.

-कमलबाई पवार, नंदुरबार.

खासगी रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया करणे खर्चिक असल्याने माझ्यासारखे ज्येष्ठ जिल्हा रुग्णालयात जातात. आता त्या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार होत आहेत. यातून संसर्गाची भीती आहे. म्हणून ऑपरेशन टळले.

-अशोक पाटील, तळोदा.