शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशात अक्षय तृतीया सणाला महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST

वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेच्या सणाला गौराईची पूजा बांधली जाते. चैत्र महिन्याच्या चतुर्दशीस खान्देशात घरोघरी गौराईची मांडणी केली ...

वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेच्या सणाला गौराईची पूजा बांधली जाते. चैत्र महिन्याच्या चतुर्दशीस खान्देशात घरोघरी गौराईची मांडणी केली जाते. ग्रामीण भागात या सणाला खूपच महत्त्व आहे. सासुरवाशिणी या सणाला आवर्जून माहेरी येतात. चैत्रात वसंत फुलतो, लहान मुले-मुली व तरुणांमध्ये आनंदाचे उधाण असते. हातात टिपऱ्या घेऊन गाणे म्हणत गौराईची स्तुती करीत या मुली नदीकाठाने गौराईला प्रसन्न करण्यासाठी वेशीच्या आत असलेल्या नदी-नाल्यावर जातात. गौराईला अहिराणीत ‘गवराई’ म्हणतात. गौरी हे पार्वतीचे रूप मानले जाते. गौरी ही आर्यांची ‘सौंदर्य देवता’ म्हणून मानली जाते.

गौराईची मांडणी

गौराईची प्रतिकृती लाकडाची तयार केलेली असते. दरवर्षी चैत्र महिन्याच्या चतुर्दशीपूर्वी गौराईला स्वच्छ पाण्याने धुतले जाते. गौराईचा मुखवटा कोरलेल्या दोन छोटे साधारणत: दहा-अकरा इंचीचे दोन लाकडी भाग व त्याच लाकडाला खाली एक फळी, दोन बारीक लाकडांच्या साहाय्याने जोडलेल्या असतात. लाकडी फळीवर सुंदर नक्षीकाम केलेले असते. पौर्णिमेच्या दिवशी विधिवत पूजा करण्यापूर्वी गौराई ज्या ठिकाणी मांडायची आहे ती जागा शुभ्र मातीने सारवून घेतली जाते. मुली व स्त्रिया सोयीनुसार नक्षीकाम चित्रे काढतात. त्याला ‘गौराईचे घर’ म्हणतात. पाट टाकूनही गौराई बसवतात. गौराईला बाशिंग बांधतात.

गौराईचे बार...

दररोज सकाळी गावातल्या सर्व कुमारिका व सासरहून आलेल्या मुली तांब्या व खाऊ घेऊन टिपऱ्यांच्या आवाजात नदीकडे जातात. नदीवर जवळपासच्या गावाच्या मुलीही आलेल्या असतात. नदीकाठावर गाणे म्हणता-म्हणता शिव्याही सुरू होतात. त्याला खानदेशात ‘गौराईचे बार’ खेळणे म्हणतात. खेळ खेळताना मुली एकमेकीला घाणेरडे शब्द वापरतात. नदीतून किंवा नदीकाठी असलेल्या विहिरीवरून पाण्याचा तांब्या भरून त्यावर आंब्याची पाच पाने व एक कच्ची कैरी ठेवतात, याला ‘डवणा’ म्हणतात. घरी आल्यावर आंब्याची कोवळी पाने गौराईपुढे ठेवतात व पाणी तुळशीला टाकतात. अशा रीतीने १५ दिवस म्हणजे अक्षय तृतीयेपर्यंत हा खेळ सुरू राहतो.

गौराईची पूजा

गौराईच्या पूजेत रोज वेगवेगळ्या पदार्थांची माळ असते. टरबूज, डांगर व काकडीच्या बिया, आंब्याची लहान कैरी, गहू, हरभरा, शेंगा, मुरमुरे, बिस्कीट, शेव, शेवग्याच्या (सौंदळ) शेंगांची माळ आदी विविध प्रकारच्या माळा केल्या जातात. अक्षय तृतीयेच्या अगोदरच्या दिवशी सांजोऱ्या, करंज्या, कणकेच्या पुतळ्यांच्या माळा करून गौराईला घालतात. त्याचदिवशी मुली दोन पिवळे फडके करून ताटलीत धान्य घेऊन कुंभाराकडे जातात. कुंभाराकडे मातीच्या घोड्यावर एका मातीच्या माणसाला बसवले असल्याची प्रतिकृती असते. त्याच्यामागे डोक्यावर छत्रीसारखे केलेले असते. त्याला ‘शंकर’ असे म्हणतात. तो शंकर मुली घरी आणतात. तो गौराईचा पती असतो. गौराईला घेण्यासाठी आलेला असतो. मुली १५ दिवस झोक्यावर बसून गाणे म्हणून हा सण अतिउत्साहात साजरा करतात. अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सर्व मुली शंकर व गौराईला नदीवर नेतात. शंकराला नदीत टाकून गौराईला घरी आणतात. गौराई त्या दिवसापासून सासरी गेली असे समजतात.

गौराईची गाणी

गौराईची गाणी अत्यंत श्रवणीय आहेत. गौराई ही नवसाची देवता नाही. गौराईची काही निवडक गाणी खान्देशात प्रसिद्ध आहेत.

केशर झणझणनी-

सोनानी सुतळी तडे मना कनेर पाणी भरणे व ।

केशर झणझणनी तटे मनी गौराई न्हायनी व।

गौराईनी माळ-

वाटेवर हिर कुणी खंदी व माय शंकर राजाने खंदणी व माय...

कसाना भरी उना ताट-

कसाना भरी उना ताट, ताट मनी गौराईले।

शिय्यासना भरी उना ताट, ताट मनी गौराईले।।

(या गाण्यात लाडू, जलेबी, कलाकंद यासह विशिष्ट पदार्थांची नावे घेऊन गाणे म्हटले जाते.)

आथानी कैरी तथानी कैरी-

आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय व।

कैरी तुटनी खडक फुटणा, जुई जुई पाणी व्हाय व।

गौरी पाणीले जाय-

चैत्र वैशाख अणे कथा खोकत जाय आज मनी गौर पाणीले जाय...

आदी गीते गाऊन माहेरवाशीण मुली आपला आनंद व्यक्त करतात आणि हा आगळा-वेगळा सण उत्साहात साजरा केला जातो.