शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

सात वाजता सुरू होते नोंदणी, काही मिनिटात हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST

नंदुरबार : जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांचे लसीकरण १ मेपासून सुरू आहे. या वयोगटातून नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. ...

नंदुरबार : जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांचे लसीकरण १ मेपासून सुरू आहे. या वयोगटातून नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. परंतू लसीकरणासाठी नोंदणी करताना मात्र असंख्य अडचणी येत असून मोबाईल ॲप आणि पोर्टल हे सायंकाळी सात वाजता सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच नोंदण्या पूर्ण होऊन बंद होत आहे. यातून लस घेण्यासाठी इच्छुकांच्या उत्साहावर पाणी फेरले जात आहे.

जिल्ह्यात आजअखेरीस १ लाख ८७ हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व वयोगटाकडून लस घेण्यास प्रतिसाद देण्यात येत आहे. आरोग्य विभागाने निर्माण केलेल्या ४४ केंद्रांवर दररोज नागरिक गर्दी करत असले तरी १८ ते ४४ या गटातील नागरिकांना मात्र नोंदणी करण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत आहे. ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी मोबाईल ॲप ओपन केल्यानंतर मोबाईल क्रमांक टाकल्यावर येणारा ओटीपीच येत नसल्याने पुढची प्रक्रिया पूर्ण होत नाही. ज्यांना ओटीपी आला तो सबमिट केल्यानंतर पुढील पेज ओपन होत नसल्याची माहिती दिली गेली आहे.

दुर्गम भागात उशिराने तरीही फुल्ल

आरोग्य विभागाने धडगाव व अक्कलकुवा या दोन तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी रात्री उशिराने ॲपवर नोंदणीची सोय करुन दिली आहे. परंतु या ठिकाणी इतर गावांतील नागरिक नोंदणी करून लसीकरण करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे सपाटीच्या तालुक्यांमध्ये तसेच शहरांमध्ये सायंकाळी सातवाजेपासूनच अनेक जण कामाला लागत आहेत. नोंदणी व्हावी यासाठी अनेक जण मोकळ्या जागा आणि टेरेसचा आधार घेत थांबून राहतात. तरीही नोंदणी होत नसल्याचे सांगण्यात आले.

गेल्या आठवडाभरापासून प्रयत्न सुरू आहे. दररोज सायंकाळी साडेसहापासून ॲप ओपन करून ठेवतो. नोंदणी सुरू केल्यानंतर काही वेळात ते हँग होण्यास सुरुवात होते. अर्धीअधिक माहिती भरली असताना बाहेर आले की, पुन्हा नव्याने नोंदणी होत नाही. तरीही प्रयत्न सुरू आहे.

- सुनील पावरा, नंदुरबार

घरातील वृद्ध आईचे लसीकरण करायचे आहे. यासाठी ॲप शिकून घेत डाऊनलोड केले आहे. १० दिवसांपासून दररोज सायंकाळी ॲप ओपन करतो. परंतु नोंदणीच होत नाही. नेटवर्कची समस्या नाही. परंतु वारंवार ॲप हँग हाेते. मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे काहीच होत नाही.

-कैलास मराठे, नंदुरबार.

दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क ही सर्वात मोठी समस्या आहे. रात्रीच्यावेळी सर्व टाॅवर सुरू राहत असल्याने नेटवर्क बरे असते. यातून नोंदणीसाठी ॲपचा वापर केल्यावर ॲप ओपनच होत नसल्याचा अनुभव आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओटीपी येत नाही.

-राकेश पावरा, धडगाव.

जिल्ह्याच्या लसीकरणाचा जो कोटा आहे त्यानुसार नोंदणी सुरू आहे. या नोंदणीत नागरिकांना अडचणी येत आहेत. परंतु ही समस्या संपूर्ण राज्यात सुरू आहे. एकाच वेळी असंख्य युझर्स ॲप ओपन करत असल्याने त्या अडचणी येतात. तरीही जिल्ह्यातील नागरीकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

- डाॅ. एन. डी. बोडक, जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार.