शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात दुचाकीच्या धडकेत मयत झालेला व्यक्ती निघाला उपसरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार :   तळोदा शहरातील खटाईमाता मंदिराजवळ दुचाकी अंगावर चालून गेल्याने एकाचा मृत्यू झाला होता. बुधवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार :   तळोदा शहरातील खटाईमाता मंदिराजवळ दुचाकी अंगावर चालून गेल्याने एकाचा मृत्यू झाला होता. बुधवारी रात्री घडलेल्या घटनेतील मयताची ओळख पटत नसल्याने पोलीस चहू बाजूने दुचाकीस्वार व मयत यांचा शोध घेत होता. यात दुचाकीस्वार हा अल्पवयीन तर मयत हा तोलाचापाडा ता. तळाेदा गावाचा उपसरपंच असल्याचे समाेर आले आहे. मानसिंग रित्या पाडवी (४०) रा. तोलाचापाडा असे मयताचे नाव आहे. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास एमएच ३९ एई -०७५९ ही दुचाकी डोक्यावर चालून गेल्याने मानसिंग पाडवी यांचा मृत्यू झाला होता. तळोदा शहरातील अक्कलकुवा बायपास परिसरातील खटाई मंदिराजवळील रस्त्यावर हा अपघात घडला होता. याप्रकरणी तळोद्याचे पोलीस पाटील बापू नारायण पाटील यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन चिनोदा येथील अल्पवयीन दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार भरधाव वेगात बायपास रोडकडे जात असताना हा अपघात घडल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान मानसिंग पाडवी हे त्याठिकाणी आधीपासून रक्ताळलेल्या अवस्थेत पडून असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अपघात की घातपात असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान बुधवारी रात्री अपघात घडल्यानंतर मयत मानसिंग पाडवी यांची ओळख पटवण्यासाठी पोलीसांची मोठी धावपळ उडाली. अखेर गुरूवारी दुपारी चार वाजता मयत तोलाचापाडा गावचे उपसरपंच असल्याचे उजेडात आल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांना संपर्क करुन माहिती देण्यात आली.