शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर तालुक्यातील साडेतीन लाख लोकसंख्येत केवळ १० हजार लोकांनी लसीकरण केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:31 IST

नवापूर तालुक्यातील बोकळझर गावात लसीकरणासंदर्भात जनजागृती रथ तयार करून लसीकरणासंदर्भात आवाहन करण्यात येत आहे. शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक आरोग्य ...

नवापूर तालुक्यातील बोकळझर गावात लसीकरणासंदर्भात जनजागृती रथ तयार करून लसीकरणासंदर्भात आवाहन करण्यात येत आहे. शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक आरोग्य अधिकारी, नर्स, डॉक्टर होम टू होम लसीकरणाचे सर्वेक्षण व जनजागृती करीत आहेत. काही स्वयंसेवी संस्था गीत सादर करून आवाहन करीत आहे. गावातील सरपंच राहुल गावित, शिक्षक अनिल पाटील, सुनील नहिरे, प्रदीप अहिरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. ग्रामीण भागात लसीकरणाबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, ही भीती दूर करणे गरजेचे आहे. नंदुरबार जिल्ह्यात साधारणत: वीस लाख लोकसंख्येत फ्रंटलाइन वर्कर, ६५ वर्षे ते ४५ वर्षातील साधारण १ लाख लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. नवापूर तालुक्यात एकूण ३ लाख ३९ हजार लोकसंख्या असून, पहिला डोस ७ हजार ४८८ तर दुसरा डोस २ हजार ५३३ लोकांनी घेतला आहे. लसीकरणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

लसीकरण वाढण्यासाठी तालुक्यात जनजागृती मोहीम व होम टू होम सर्वेक्षण केले जात आहे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, दोन्ही लसी सुरक्षित आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी माहिती मंदार कुलकर्णी यांनी दिली आहे. लसीकरण वाढवण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

शहरी भागांमध्ये लसीकरणासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. परंतु नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणासाठी प्रशासनाला वारंवार आवाहन करावे लागत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून लसीकरण तसेच शासनाने दिलेल्या त्रिसूत्री मंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क, शारीरिक अंतर, हात स्वच्छ धुणे, नवापूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. काल २५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत.