शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

जयनगर परिसरात हळद पिकाची काढणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST

हळदीला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. यापासून अनेक औषधीसह स्वयंपाकातही मोठ्या प्रमाणात वापर होतो. सध्या कोरोना काळात मोठ्या प्रमाणात हळदीला ...

हळदीला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. यापासून अनेक औषधीसह स्वयंपाकातही मोठ्या प्रमाणात वापर होतो. सध्या कोरोना काळात मोठ्या प्रमाणात हळदीला मागणी आहे. मात्र हे पीक खानदेशात कमी प्रमाणात घेतले जाते. त्यातच नंदुरबार जिल्ह्यात मोजकेच शेतकरी या पिकाची लागवड करतात. शहादा तालुक्यात जयनगर, कलसाडी, पाडळदा या भागात मसालेजन्य पिकांची लागवड होते. कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून बॉयलिंग व पॉलिश मशीनसाठी अनुदान उपलब्ध करून दिल्यास पुढील काळात या पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढणार आहे.

हे पीक नऊ महिने कालावधीचे असल्याने त्यातच आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर असल्याने इतर शेतकरी जोखीम स्वीकारत नाहीत. मात्र येथील विठोबा माळी या प्रयोगशील शेतकऱ्याने सलग दहा वर्षांपासून हळद पिकाची लागवड केली आहे. सुरुवातीला लागवड, बाजारपेठ व त्यावरील प्रक्रिया या बाबींसाठी अडचणीचे ठरले. त्यातून कृषी विभाग व अन्य ठिकाणांहून मार्गदर्शन घेऊन दहा वर्षांपासून दहा एकरमध्ये पिकाची लागवड करीत आहे. एकरी २५ ते ३० क्विंटल असे उत्पन्न काढून आठ ते दहा हजार रुपये क्विंटल भावाने विक्री करीत आहेत. जिल्ह्यात हळदीला मोठी मागणी नसली, तरी सांगली व सातारा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तेथील व्यापारी थेट शेतात येऊन हळदीची खरेदी करतात.

अशी करतात हळदीची लागवड

साधारण ४० ते ५० ग्रॅमचे मातृकंद व फिंगर मिक्स कंद मातीच्या बेडवर सात-आठ इंच खोल जून महिन्यात लागवड केली जाते. नऊ महिन्यांच्या कालावधीत खताच्या तीन मात्रा दिल्या जातात. बुरशीनाशक फवारणी केली जाते. एकरी दहा क्विंटल कंद लागतात. त्याची ओळख हिरवा पाला पिवळा झाल्याने खाली पडला की हळद पक्व झाल्याचे समजते. काढलेली हळद बॉयलिंग केली जाते. त्यानंतर पंधरा दिवस सुकविली जाते. मशिनवर पॉलिश करून पिवळी चमक आल्यावर विक्रीसाठी पाठवली जाते.

मागील दहा वर्षांपासून हळद पिकाची लागवड करीत आहे. सुरुवातीला लागवडीसाठी अनेक अडचणी आल्या. त्यातून मार्ग काढत व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आज हळद पिकातून भरघोस उत्पादन घेत आहे. स्वतःचे बॉयलिंग व पॉलिश मशीन असल्याने पाहिजे त्यावेळेस प्रक्रिया करून भाव वाढल्यानंतर हळद विक्री केली जाते.

विठोबा माळी, शेतकरी, जयनगर, ता. शहादा

औषधी महत्त्व

आयुर्वेद शास्त्रानुसार हळद पोटदुखी निवारक, रक्तशुद्धीकारक, बलवर्धक, कृमीनाशक आम्लपित्तहारक, भूक उद्दीपित करणारी आहे. हळदीमुळे त्वचेचा रंग उजळतो तसेच ती रक्तशुद्धीसाठी गुणकारी आहे.