शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

नांदे, मालदा येथे लसीकरणाचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST

कोरोना विषाणू संक्रमणाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा महत्त्वाचा घटक आहे, मात्र ग्रामीण भागातील आदिवासी नागरिकांमधे या लसीकरणाबाबत अनेक गैरसमज ...

कोरोना विषाणू संक्रमणाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा महत्त्वाचा घटक आहे, मात्र ग्रामीण भागातील आदिवासी नागरिकांमधे या लसीकरणाबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. आदिवासींमधील शिक्षणाचा अभाव व अंधश्रद्धा यांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी लसीकरण मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. आदिवासींमध्ये जनजागृती व्हावी, त्यांचे १०० टक्के लसीकरण व्हावे यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी लसीकरण करणाऱ्या प्रत्येक आदिवासी नागरिकाला प्रत्येकी दोन किलो साखर व तांदूळ प्रोत्साहन म्हणून दिले जाईल, अशी घोषणा केली होती. मंगळवारी शहादा तालुक्यातील नांदे येथे व्यस्तीबाई गोरख ठाकरे (९५) या वयोवृद्ध आदिवासी महिलेचे लसीकरण करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. नांदे येथे ६० व मालदा येथे ५० अशा एकूण ११० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की, महाराष्ट्रात कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. कोरोनासारख्या भयंकर आजारावर मात करायची असेल तर प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याची गरज आहे. आदिवासी समाजात कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल गैरसमज पसरविण्यात आला आहे. त्यामुळे प्रोत्साहन म्हणून ४५ वर्षांवरील ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्या पुरुष व महिलांना दोन किलो तांदूळ व दोन किलो साखर देण्यात येत आहे. कारण लॉकडाऊनमुळे मजूर वर्गाला काम नाही म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे. उद्दिष्ट एवढेच आहे की, १०० टक्के लसीकरण करून घेण्याचा आमचा मानस असल्याचे ते म्हणाले.

या वेळी गटविकास अधिकारी रघुवेंद्र घोरपडे, प्रभारी तालुका आरोग्याधिकारी डॉ. मणिलाल शेल्टे, तालुका शिक्षणाधिकारी उषा पेंढारकर, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, दिनेश खंडेलवाल, नांदेचे सरपंच काशीराम मोरे, मालदाचे सरपंच गोपी पावरा, रामपूरचे सरपंच नर्मदा पावरा, कुसुमवाडाचे सरपंच दिलीप पवार, सरकारी स्वीय सहायक वीरसिंग पाडवी, अदिवासी मोर्चा जिल्हा सचिव नारायण ठाकरे, प्रविण वळवी, आदिवासी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दंगल सोनवणे, दीपक ठाकरे, दिनेश कोराणे, ग्रामपंचायत सदस्य काशीराम मोरे, मनोज बागुल, अविनाश सामुद्रे, ग्रामसेवक किशोर वळवी, सोनू वळवी, हेमराज पवार, विक्की ठाकरे व ग्रामस्थ उपस्थित होते.