शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

कृती आराखडे १ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा यांच्या अध्यक्षतेखाली तळोदा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील ...


लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा यांच्या अध्यक्षतेखाली तळोदा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील २७ सामूहिक वनहक्कप्राप्त गावांच्या कृती आराखड्यासंदर्भात सर्व विभागाच्या प्रमुखांची गाव वनव्यवस्थापन समिती समिती सदस्यांची आढावा बैठक झाली. यात शासनाच्या सर्व विभागांच्या योजनांचा समन्वय करून १ आक्टोबरपर्यंत या गावांचे कृतीआराखडे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याबाबत वनहक्क कायदा २००८ नुसार सामूहिक वनहक्क प्रदान करण्यात आलेल्या गावांमध्ये गावांना मिळालेल्या सामूहिक वनक्षेत्राचे व्यवस्थापन व संवर्धन करण्यासाठी त्यांचे कृती आराखडे बनविण्यासाठी लोकसमन्वय प्रतिष्ठान ही संस्था कार्यरत आहे. त्याअंतर्गत निवडलेल्या २२ गावांमध्ये गावसमित्या तयार करून कृती आराखडे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याबाबत आजची बैठक आयोजित केली होती. या वेळी प्रतिभा शिंदे, लोकसमन्वयचे संजय महाजन, जि.प. सदस्य गणेश पराडके यांच्यासह २७ गावांचे समिती सदस्य उपस्थित होते. प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत तळोदा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील वनविभाग, कृषी विभाग, महसूल विभाग मत्स्य उद्योग, पशुसंवर्धन व आदिवासी विकास विभाग यांचे अधिकारी, तळोद्याचे तहसीलदार पंकज लोखंडे आदी उपस्थित होते.
बैठकीत प्रतिभा शिंदे यांनी देशात कोरोनामुळे सद्यस्थितीत जी परिस्थिती उद्भवली आहे त्यामुळे सर्वच क्षेत्रात आर्थिक संकट उभे राहिले आहे आणि आपल्या जिल्ह्यातही आदिवासी व शेतकरी शेतमजूर यांच्यावरही याचा परिणाम होऊन रोजगार आणि उपजिविकेची मोठी समस्या उभी राहणार आहे. त्यासाठी वनसंवर्धन व त्यातून रोजगार निर्मितीवर भर द्यावा लागेल. ज्यातून या गावांमध्ये लोकांची उपजिविका व जीवनमान उंचावता येईल म्हणून या कृती आराखड्यात सर्व विभागांच्या योजनांचा समन्वय करून गावाची विकास कामे करता येतील. तसेच स्थानिक नैसर्गिक संसाधनांचे रक्षण व संवर्धनही होईल, असे सांगत सर्व विभागांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा यांनी सर्व विभागांनी या प्रक्रियेत आपले योगदान द्यावे तसेच ही प्रक्रिया लोकांसाठी महत्वपूर्ण असल्याने सर्व शासकीय यंत्रणांनी आपापल्या विभागांची माहिती सादर करावी, अशा सूचना केल्या. बैठकीत विजय ब्राम्हणे, धनसिंग वसावे, दिलीप वसावे, मुकेश पावरा, नारायण पावरा, अशोक पाडवी, दिलवर पाडवी, निशांत मगरे यांच्यासह गाव समिती सदस्य सहभागी झाले होते.